Senior Citizen Scheme योजनेत झालेत बदल; वेळेआधी खाते बंद केल्यास होईल नुकसान

Senior Citizen Scheme । सरकारकडून वृद्ध लोकांचे सेवा निवृत्तीनंतरचे दिवस आनंदी जावेत म्हणून काही योजना राबवल्या जातात तसेच बँकांकडून या योजनांच्या आधारे मदत देऊ केली जाते. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर उतारवयात आराम करणे आणि आपल्या जवळच्या मंडळींसोबत आनंदाने आयुष्य जगणे असा प्रत्येकाचा विचार असतो. यावेळी शारीरिक क्षमता कामी झालेली असते आणि कोणताही माणूस पूर्वीप्रमाणे कामात स्वतःला झोकून देऊ शकत नाही, या काळात गरज असते ती शारीरिक आणि मानसिक आरामाची. आजची वाढती महागाई पाहता एखादा माणूस तेव्हाच सुखाची झोप घेईल जेव्हा त्याच्या मनावर कोणताही आर्थिक ताण असणार नाही म्हणूनच सरकारकडून आर्थिकदृष्ट्या निश्चिंत राहण्यासाठी अश्या योजनांची तरतूद केली गेली आहे, Senior Citizen Scheme ही त्यातीलच एक योजना आहे. मात्र वृद्ध लोकांसाठी बनवलेल्या या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ते कोणते हे जाणून घेऊया….

वृद्ध लोकांच्या योजनांमध्ये बदल: (Senior Citizen Scheme )

सेवा निवृतीनंतरचा काळ हा आयुष्यभर कमावलेल्या मिळकतीच्या आधारे जगायचा असतो अशी एक संकल्पना बनलेली आहे. आणि त्याच दृष्टीने सरकार काही योजना राबवतो, मात्र आता वृद्धांसाठी बनलेल्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन बदलांनुसार वेळेच्या आधी जर का तुम्ही बँकमधले खाते बंद करणार असाल तर जमा केलेल्या रकमेवर कात्री फिरवली जाईल. याआधी नियमांप्रमाणे वेळेआधी रक्कम मागे घेतल्यास मिळणारे व्याज बाजूला सारून राहिलेल्या रकमेचा संपूर्ण ताबा दिला जायचा, मात्र आता असे होणार नाही. आता वेळेआधी खाते बंद केल्यास जमा केलेल्या रकमेवर 1 टक्क्याची कट लावण्यात येईल.

काही दिवसांपूर्वी पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये काही बदल करण्यात आले होते, ज्यांमध्ये जेष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत जर का कोणी वेळेआधी रक्कम मागे घेण्यात इच्छुक असल्यास त्यावर जेवढ्या महिन्यांसाठी गुंतवणूक केलेली आहे त्यानुसार व्याज देऊ केला जाईल. जर कोणी पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यानंतर चार वर्षांनी खाते बंद करत असेल, तर या परिस्थितीत त्यांना बचत खात्याप्रमाणेच व्याजाचा लाभ दिला जाईल. यापूर्वी अशा परिस्थितीत तीन वर्षांसाठी लागू होणारा व्याजदर दिला जायचा (Senior Citizen Scheme).

याशिवाय आता पाच वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधीही काढून टाकण्यात आला आहे. सध्या वरिष्ठ नागरिक योजनेंतर्गत वार्षिक 8.2 टक्के व्याज दिला जातो पण खाते वेळेपूर्वी बंद केल्यास, बचत खात्यावर लागू होणारा 4 टक्क्यांचा व्याजदर दिला जातो. याशिवाय आता गुंतवणूकदारांना सहा महिन्यांच्या आधी आपले खाते बंद करता येणार नाही, तसेच एक वर्षाआधी खाते बंद केल्यास व्याजदर बदलले जातील. मात्र गुंतवणूक करण्यात इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता गुंतवणुकीचा काळ 3-3 वर्षांसाठी पुढे ढकलता येणार आहे.