Senior Citizen Schemes: आजी आणि आजोबांनो, तुमच्या आयुष्याचा हा आराम करण्याचा टप्पा आहे. आयुष्यभर काम आणि मेहनत केल्यांनतर हा काळ तुम्ही निश्चिन्तपणे घालवयचा असतो. मात्र या टप्प्यातही आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा! कर बचत हा केवळ तुमच्या आर्थिक भार कमी करण्याचा भाग नाही, तर तुमच्या हातात असलेला पैसे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी एक महत्वाचा निर्णय ठरू शकतो. मग आपण कर कसा वाचवायचा याकडे बघूया…
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली: 60 ते 80 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तुलनेत अधिक करमुक्त उत्पन्न मिळते. तुमची 3 लाख रुपयांची कमाई करमुक्त राहते, तर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 2.5 लाख रुपये आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तर 5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त राहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
80 TTB कलम(Senior Citizen Scheme) : उत्पन्नावर कर हा भरावा लागतोच पण, बँक, सहकारी संस्था किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर 50 हजार रुपयांपर्यंत कर बचत करता येते. यासाठी 80 TTB कलमचा लाभ घ्या, ही तरतूद 80C कलमाखाली मिळणाऱ्या 1.5 लाख रुपयांच्या कर बचतीपेक्षा अधिक असते.
50 हजारांचा मानक कपात : 2020 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठांसाठी 50 हजार रुपयांचा मानक कपात लागू झाला. निवृत्ती घेतलेल्यांनाही हा लाभ मिळतो, म्हणजे त्यांचा कर आणखी कमी होतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) : ही 60 वर्षांवरील मान्यताप्राप्त नागरिकांसाठी खास तयार केलेली सरकारी योजना आहे. या योजनेद्वारे तुम्हाला दर तिमाही ठरलेल्या दराने व्याज मिळते. सध्या, म्हणजे मार्च तिमाहीच्या शेवटी या योजनेवर 8.20 टक्के एवढा आकर्षक व्याज दर दिला जातोय. याशिवाय, तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर बचत करू शकता.
NSC : ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे जी चांगले परतावा देते. त्यामुळे तुमच्या पैश्यांसाठी धोका निर्माण न करता चांगला परतावा मिळवायचा असेल तर NSC तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो(Senior Citizen Schemes).
PPF : जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल तर आयकर अधिनियम कलम 80C अंतर्गत कर कपात मिळते. इतकेच नाही, तर इथे मिळालेले व्याज आणि परिपक्व रक्कम देखील करमुक्त असते. म्हणजे तुमचे पैसे वाढतात आणि त्यावर करही भरावा लागत नाही. विशेष म्हणजे ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी लॉक असते, त्यामुळे तुमचे पैसे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करतात आणि तुम्ही तुमच्या भविष्याचा आराखडा बनवू शकता.