Sensex Record: आज Sensex ने केला विक्रमी पराक्रम; पहिल्यांदाच पार केला 74,000 चा आकडा

Sensex Record: बाजारात आज मोठा बदल झालेला पाहायला मिळाला, आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक Nifty आणि Sensex यांनी जोरदार सुधारणा केली आणि विक्रमी नवीन उच्चांवर पोहोचले. Sensex ने आज दिवसाच्या सर्वात कमी पातळीवरून (74,018.39) तब्बल 694 अंकांची झेप घेत विक्रमी उच्चांक गाठला. एवढंच नाही तर Nifty 50 हा निर्देशांकही 22,453.95 अंकांच्या सर्वोच्च विक्रमावर पोहोचला.

जबरदस्त वाढीचे कारण तरी काय? (Sensex Record)

NSE वर Nifty निर्देशांक हा आज 568 इतक्या मोठ्या वाढीने 48,143 च्या उच्चांवर पोहोचला. या वाढीमागे बँकिंग क्षेत्रातील जोरदार खरेदीचा प्रमुख वाटा आहे असे तज्ञ सांगतात. Sensex मध्ये ICICI Bank, Axis Bank, कोटक महिंद्रा बँक आणि HDFC Bank या बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

आज Nifty बँकेच्या निर्देशांकात 1 टक्क्याची वाढ झाली. त्याचबरोबर Nifty Finance Services, FMCG, IT, Pharma आणि खासगी बँक निर्देशांक देखील 0.5 ते 1 टक्क्यांनी वाढले. कोटक महिंद्रा बँकचा शेअर आजच्या दिवसाचा विजयी वीर म्हणावा लागेल, कारण आज कोटकने 1,762 रुपयांपर्यंत मजल मारली, शिवाय शेअर वाढ होणाऱ्या कंपन्यांमध्ये Axis Bank, Bajaj Auto, Divi’s Labs, SBI Life, Sun Pharma, Tata Consumer Products, Titan and Mahindra & Mahindra यांचाही समावेश होता.

दुसऱ्या बाजूला आज ltratech Cement, Adani Enterprises, NTPC, Bharat Petroleum, JSW Steel, Adani Ports, Maruti Suzuki आणि Power Grid या कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Sensex Record) घसरण झालेली पाहायला मिळाली.