Sessa Iron and Steal Limited । मेटल आणि मायनिंग सेक्टरचे नावाजलेले उद्योगपती अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली आहे. या नवीन कंपनीचे नाव Sessa Iron and Steal Limited असे असून कंपनीची सुरुवात गोव्यात होणार आहे आणि वेदान्ता लिमिटेडची उपकंपनी म्हणून ती काम करणार आहे. अनिल अग्रवाल यांनी स्थापन केलेली कंपनी नेमकं काय काम करणार हे आज आपण जाणून घेऊयात.
हे काम करणार Sessa Iron and Steal Limited :
वेदान्ता लिमिटेडकडून आलेल्या माहितीनुसार, Sessa Iron and Steal Limited ही कंपनी ग्रोथ प्रोडक्ट्ससाठी सुरु करण्यात येईल. ही नवीन कंपनी Operational कामं हाताळेल. गोव्यात आधीपासूनच वेदांताची एक कंपनी कार्यरत आहे, ज्याचं नाव Sessa Goa Iron Ore असं आहे. ही कंपनी खनिजाचा शोध घेणं, त्याचं उत्खनन करणे इत्यादी काम करते. मात्र आत्ता नवीन आलेली कंपनी Iron आणि Steel चा व्यवसाय सांभाळेल. Iron Ore हे Iron आणि Steel च्या प्रोडकशन साठी फारच महत्वाचं आहे. मात्र काही वर्षांपासून गोव्यात उत्खानांवर बंदी आहे, व सदर प्रकरण 2018 पासून सर्वोच्य न्यायालयात सुरु आहे.
वेदांत रिसोर्सेसचे मुख्य कार्यालय हे लंडनमध्ये असून ही कंपनी भारतासह अनेक देशांमध्ये धातू आणि खाण व्यवसाय करत आहे. वेदांत रिसोर्सेसने या आठवड्यात सांगितले की जाम्बिया सरकारने कोनकोला कॉपर माईन्सची मालकी आणि नियंत्रण त्यांना परत केले आहे. यापूर्वी वेदान्ता आणि जाम्बिया सरकारमध्ये वादविवाद सुरु होते. हा वाद सोडवण्यासाठी वेदान्ता रिसर्चने जाम्बिया येथे मायनिंग मध्ये तब्बल 1 बिलिअन डॉलर गुंतवण्याचा शब्द दिला होता. कंपनीचे चेअरमन अनिल अगरवाल म्हणतात कि सुरुवातीपासूनच ते कोंकोला कॉपर माइन्स सोबत प्रामाणिक आहेत व ते त्यांना व्यवसायचा प्रमुख हिस्सा मानतात.
वेदान्ता रिसोर्सेची सध्या स्थिती कशी आहे?
वेदान्ता रिसर्चची आर्थिक स्थिती बिकट आहे. या आधीसुद्धा अनेक महिन्यांपासून अश्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. कंपनीने 1.3 बिलिअन डॉलरच्या लोन साठी स्टेनर्डड चार्टड बँक सोबत चर्चा सुरु केली आहे. हे लोन 3 वर्षांसाठी घेतलेलं असू शकतं व यावर 14 ते 15% दर लागू शकतो .