Shaktikanta Das : RBI Governor शक्तीकांत दास यांना A+ रँक; उत्तम कामगिरीबद्दल जागतिक सन्मान

Shaktikanta Das । देशातील सर्व बँकांची मालक असलेली बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया. आपल्या सर्वांसाठीच हि बातमी आनंदाची आणि अभिमानाची आहे कारण रिझर्व बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांना एक मोठा सन्मान देऊन गौरविण्यात आलं आहे. आपल्या देशातील सर्वोत्तम बँक असलेल्या RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात झालेला हा सन्मान देशातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी बनला आहे. आज जाणून घेऊया नेमकं कश्यासाठी शक्तीकांत दास यांचा गौरव करण्यात आला.

RBI Governor शक्तीकांत दास यांचा गौरव : Shaktikanta Das

RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांना मोरोक्को येथे आयोजित ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बेन्कर कार्ड्स मध्ये A+ असा रँक देण्यात आला आहे. ज्या मध्यवर्ती बँकांनी चांगली कामगिरी दर्शवली आहे, त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता. हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. ग्लोबल फायनान्स मेगझीन जगातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केंद्रीय बंकर्सचा अहवाल तयार करते. इथे जगातील बंकर्सच्या कामगिरीला A ते F च्या पट्टीत मोजलं जातं, सर्वात चांगली कामगिरी दाखवलेल्या बंकर्सना A रेंक मिळत तर त्यामागोमाग मिळणाऱ्या रेंक इतरांचे अपयश दर्शवित असतात. बँककडून महागाईवर कश्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यात आले, त्यंची आर्थिक विकासाची उदिष्टे काय आहेत, चलनामध्ये स्थिरता आहे ना, व्याजदर कसा आहे इत्यादी निष्कर्ष वापरून कामगिरी तपासली जाते.

या बँकर्सना मिळाला A+:

या सन्मानांची घोषणा सप्टेंबर मध्ये करण्यात आली होती, जागतिक दर्ज्याचा मानल्या जाणाऱ्या सन्मानात शक्तीकांत यांच्यासह इतर दोन बेन्कार्सना A+ चा सन्मान मिळाला. यात स्विझरलेंडचे थोमास जे आणि व्हियेतनामचे होआंग यांचा समावेश झाला आहे.