Share Market : ‘या’ शेअर्सने दिला 19000% रिटर्न; गुंतवणूकदार 4 वर्षात बनले करोडपती

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट (Share Market) म्हंटल तर चढ- उतार हे आलेच. कधी कोणता शेअर तेजीत येईल आणि कधी कोणता शेअर कोसळले हे सांगणं तस कठीणच. अनेक शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी वेळेतच मालामाल करतात. आज आम्ही अशाच एका कंपनीच्या शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने फक्त 4 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. Authum Investment And Infrastructure असं या कंपनीचे नाव आहे. कदाचित या कंपनीचं नाव तुम्ही कधी ऐकले नसेल, पण आता तिने केलेली कामगिरी कुणा प्रतिष्ठीत कंपनीपेक्षा कमी नाही.

19800 टक्के रिटर्न – Share Market

शेअर बाजारात गेल्या 4 वर्षांतच जबरदस्त परतावा देऊन Authum Investment And Infrastructure या कंपनीने नाव मिळवलं आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 19000 टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदरांना कंपनीने केवळ चार वर्षांत लखपती बनवले आहे. Authum Investment And Infrastructure चे शेअर्स 13 सप्टेंबर 2019 रोजी 2.13 रुपयांवर होते, जे वर्ष 2023 मध्ये 402.20 रुपयांवर बंद झाले. गेल्या चार वर्षांत कंपनीने 19800 टक्के परतावा (Share Market) दिला आहे.

गेल्या 3 वर्षांत शेअर्समध्ये मोठी वाढ :

Authum Investment And Infrastructure च्या शेअर्समध्ये गेल्या तीन वर्षांत भरपूर वाढ झाली. 11 सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीचे शेअर्स 11.54 रुपयांवर होते जे तीन वर्षांनी वाढून 402.20 रुपयांवर बंद झाले. उदाहरण द्यायचं झाल्यास 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या माणसाला कंपनीकडून 34.85 लाख रुपयांचा फायदा झाला असता. या कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 580 रुपये आहे, तर नीचांक 154.50 रुपये एवढा आहे.

Authum Investment And Infrastructure हि कंपनी काय आहे?

हि मुंबईमधील कंपनी शेअर्स आणि सेक्युरीटीजमधल्या गुंतवणूकिंचा व्यवहार करते. तसेच आपल्या स्टेकहोल्डर्सनां आपले उद्दिष्ट सध्या करण्यासाठी वित्तपुरवठा करते. सोप्या शब्दात याला आपण नॉन बँकिंग फायनन्शिअल कंपनी म्हणू शकतो. डांगी आणि त्यांची पत्नी अल्पना हे या कंपनीचे मालक आहेत व त्यांचा कंपनीमध्ये 71.47% हिस्सा आहे.