बिझनेसनामा ऑनलाईन । आज मंगळवारी सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केट चांगलाच तेजीत पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 123 अंकांनी वधारला आहे. तर दुसरीकडे निफ्टीही 35.20 अंकांने वाढल्याचे पाहायला मिळाले. प्रामुख्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली खरेदी आणि इतर आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंड यामुळे शेअर मार्केट तेजीत आला आहे.
आज मंगळवार ३० मे रोजी सेन्सेक्स 62,839.85 वर उघडला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स 63,036.12 पर्यंत उच्च पातळीवर गेला त्यानंतर अखेर 62,969.13 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 35.20 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 18,633.85 वर बंद झाला. खरं तर गेल्या आठवडय़ात गुरुवारपासून शेअर बाजार तेजीत आला आहे. या काळात सेन्सेक्स 1,195 अंकांनी तर निफ्टी 348 अंकांनी वाढला आहे.
आजच्या सेंसेक्सच्या शेअर्स मध्ये बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्सना चांगलाच फायदा झाला तर टाटा स्टील, टायटन, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, नेस्ले या कंपन्यांचा शेअरचे नुकसान झालं आहे. निफ्टी बाबत सांगायचं झाल्यास, कोटक बँक, HDFC लाइफ, ITC, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स ठरले आहेत तर दुसरीकडे हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, नेस्लेइंड. आयशर मोटर्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले आहेत.