Share Market मधील तेजीमागे नेमकी कारणे काय? अनुज सिंघल यांनी दिली महत्त्वाची माहिती

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केटमध्ये (Share Market) सध्या IT सोडून सर्व क्षेत्राचे निर्देशांक उच्चांकाच्या जवळ आहे. मिडकॅप इंडेक्स हे बऱ्याच दिवसापासून रोज नवीन उच्चांक गाठत आहे. स्मॉल कॅप हे निर्देशांक उच्चांकापासून अजूनही 10 टक्के दूर असून निफ्टी उच्चांकापासून 3 टक्के दूर आहे. अशी माहिती CNBC-Awaaz आणि CNBC-Bajar चे व्यवस्थापकीय संपादक अनुज सिंघल यांनी दिली आहे. तसेच बाजारात तेजी का आली याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत.

अनुज सिंघल यांच्यामते, काल शेअर बाजारात (Share Market) झालेल्या तेजीचे पाच महत्त्वाचे कारणे आहेत ते म्हणजे, निफ्टी 10 डीईएमए हे यशस्वी झाले, विना स्लीपेज 5000 करोड चा ब्लॉग पचवन्यात आला, मिडकॅप स्मॉल कॅप मध्ये काही कमजोरी आढळली नाही, फ्युचर्समध्ये बाजारात जास्त विक्री झाली. यामुळे बाजारात चांगलीच तेजी आली आहे .

निफ्टी -बँक निफ्टी बाबत काय म्हणाले – (Share Market)

निफ्टी -बँक निफ्टी वर तुमची गुंतवणूक धोरण काय असावे यावर बोलताना अनुज सिंघल म्हणाले की, 18 हजार 900 वर तीव्र घसरण झाली तरच विक्री करू शकतात. 18 हजार 850 ते 18 हजार 900 या स्तरावर निफ्टी हे नफा बुकिंग क्षेत्र आहे. शेअर बाजारात शर्ती पूर्ण झाल्यावर खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिली शर्त निफ्टी 18 हजार 900 वर टिकून राहिली तर कॉल खरेदी केले जाऊ शकतात. दुसऱ्या शर्तीमध्ये 18 हजार 900 वर तीव्र घसरण आणि 18 हजार 925 चा स्टॉपलॉस असेल तरच विक्री केली जाऊ शकते.

आजची बँक निफ्टी ही 43,400 ते 44 हजारच्या लेव्हल मध्ये आहे. म्हणजेच 43,400 च्या आसपास खरेदी आणि 44,000 च्या आसपास विक्री होत आहे. नफा मिळवण्यासाठी 43,900 ते 44,000 पर्यंत लेव्हल फायदेशीर ठरेल. जर 44 हजार 100 च्या स्टॉप लॉस सोबत 44 हजार 050 वर तीव्र घसरण असेल तरच विक्री करू शकतात. 43 हजार 350 चान्स स्टॉप लॉस सोबत फक्त 43 हजार 450 ते 43 हजार 600 झोन मध्ये नवीन खरेदी ऑर्डर करू शकतात.