बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केट मध्ये आज घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स मध्ये 340 अंकांनी घसरण झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे निफ्टी 99.45 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी घसरून 18,594.20 अंकांवर बंद झाले . गेल्या ५-६ दिवसात पहिल्यांदाच शेअर मार्केट ही घट दिसली.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 62,839.97 वर उघडला (मागील बंद: 62,969.13), त्यानंतर तो 62,876.77 पर्यंत वाढला आणि दिवसाच्या व्यवहारात शेवटी 62,401.02 पर्यंत कमी झाला. याच दरम्यान, निफ्टी आज 18,594.20 (मागील बंद: 18,633.85) वर उघडला, दिवसभराच्या व्यवहारात 18,603.90 च्या उच्चांकावर पोहोचला आणि त्यानंतर निफ्टी 18,483.85 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
आज म्हणजेच ३१ मे रोजी व्यवहारात निफ्टीच्या युटिलिटी, मेटल, एनर्जी,ऑइल अँड गॅस, आणि बँकिंग या शेअर्स मध्ये घसरण पाहायला मिळाली तर दुसरीकडे आयटी, दूरसंचार आणि रियल्टी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 12,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.