Share Market Closing: बजेटपूर्वीच बाजारात तेजी; Sensex चे आकडे 554 अंकांनी वाढले

Share Market Closing: शेअर बाजारात बुधवारीही तेजीचा सपाटा सुरूच राहिला. Sensex 400 अंकांच्या वाढीसह 71,550 च्या पुढे व्यवहार करत होते. Niftyही 110 अंकांच्या वाढीसह 21,600 च्या पुढे व्यवहार करत होता. तथापि, तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारात जोखीम नेहमीच असते, त्यामुळे बाजारात गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

शेअर बाजार बंद होताना काय होती परिस्थती? (Share Market Closing)

शेअर बाजारात बुधवारी डॉ. रेड्डीज लॅब्सचा दबदबा दिसून आला. कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या वाढत्या नफ्याचा आणि उत्पादन वाढीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला. याशिवाय आयशर मोटर, सन फार्मा आणि टाटा मोटर्सचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 3260 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचा महसूल देखील 15 टक्क्यांनी वाढून 33,512 कोटी रुपये झाला आहे.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाने (Market Capitalization) 379.57 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे(Share Market Closing). हा आकडा मागील ट्रेडिंग सत्रातील 375.38 लाख कोटी रुपयांपेक्षा 4.19 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे, याचा अर्थ असा की आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 4.19 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.