Share Market Closing: आजचा बाजारी परिणाम काय? Sensex,Nifty अचानक कोसळले

Share Market Closing: गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करता तो 6.25 टक्क्यांवर टिकवून ठेवायचा निर्णय कायम ठेवला आणि यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. व्यवहाराच्या शेवटी, Sensex 723.57 अंकांनी घसरून 71,428.43 वर बंद झाला, तर Nifty 212.50 अंकांनी घसरून 21,718 वर स्थिरावला.

आज कशी होती बाजारी परिस्थिती? (Share Market Closing)

आजच्या बाजारी कार्यावळीत बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे Nifty बँक 1.76 टक्क्यांनी घसरून 45012 पातळीवर बंद झाला. Nifty बँकेतील 12 पैकी 9 शेअर्समध्ये घसरण झाली. खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये देखील आज मोठी घसरण झाली, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

ऑटो, FMCG, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स यासारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये आज घसरण झाली. याउलट, तेल आणि वायू, ऊर्जा, मीडिया आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी मिड कॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला, तर स्मॉल कॅप निर्देशांक घसरला. Sensex मधील 30 पैकी 8 शेअर्स वधारले आणि 22 शेअर्स घसरले. Niftyच्या 50 पैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 36 शेअर्स घसरणीसह बंद झाले.