Share Market Closing: आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजार उत्कृष्ट कामगिरीसह बंद झाला. BSE Sensex 385 अंकांनी वाढून उच्च पातळीवर बंद झाला. Nifty नेही 92 अंकांची उडी घेत 22204 अंकाचा नवीन उच्चांक गाठला. थोडक्यात सांगायचं झालं तर निफ्टी मिडकॅप-100, BSE स्मॉलकॅप, Nifty IT Index मध्ये घसरण दिसून आली. Nifty Auto, Nifty Pharma आणि Nifty FMCG Index हे घसरणीच्या पातळीवर बंद झाले. Nifty Bank आणि Nifty Financial Services निर्देशांकात तेजी दिसून आली.
कोण होते आजच्या दिवसातील Top-Gainers? (Share Market Closing)
मंगळवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला.
यापैकी मल्टीबैगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये पटेल इंजीनियरिंग,Broad Concept, कामधेनु लिमिटेड, Jio Financials, HDFC Bank, Axis Bank, कोटक महिंद्रा बँक, ICICI Prudential Life, नेस्ले,ONGC, ग्लोबस स्पिरिट आणि लार्सन आणि टुब्रो(L&T) यांचा समावेश आहे. याशिवाय, देवयानी इंटरनेशनल, एशियन पेंट्स, ICICI Bank, HDFC Life आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
गौतम अदानी यांच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी घसरले. पतंजलि फूड्स आणि फेडरल बँकेसह रिलायन्स, मारुति सुझुकी, इंफोसिस आणि मुथूट फायनान्स सारख्या इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली(Share Market Closing). दुसरीकडे, बजाज फायनान्स, IRCTC आणि Adani Wilmer यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली तसेच, ACC, अंबुजा सीमेंट आणि Adani Total Gas यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती.