Share Market Closing: आजचा दिवस बाजारासाठी खास; गुंतवणूकदारांनी कमावला 5.83 लाख कोटी रुपयांचा फायदा

Share Market Closing: शेअर बाजाराबद्दल माहिती जाणून घेण्यात उत्सुक आहात का? हो तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा, कराण आज आपण शेअर बाजार बंद होताना घडलेल्या घडामोडींचा अंदाज घेणार आहोत. अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजार वाढीसह बंद झाला आहे, शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक आज वाढीसह बंद झालेत. आजच्या बाजारी दिवसांत Sensex 540 अंकांनी वाढून 72641 वर बंद झाला. Nifty 172 अंकांनी वाढून 22,011 वर पोहोचला होता.

आज कसा होता बाजारी दिवस? (Share Market Closing)

आज बाजारात झालेल्या खरेदीमुळे Midcap मधील शेअर्स वाढीसह बंद झालेत आणि यामध्ये Smallcap मधील शेअर्स सुद्धा कमी नव्हते. बँकिंग, ऑटो,IT,Pharma, FMCG, मेटल, ऊर्जा, तेल आणि Gas, Consumer Durable आणि आरोग्य सेवा अश्या विविध क्षेत्रांमध्ये देखील आज बऱ्यापैकी वाढ झाली.

महत्वाची गोष्ट म्हणजे आज Sensex मधील 30 पैकी 26 शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला Nifty मधील 43 शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत. आजचा दिवस आपण बाजारासाठी चांगला होता असं नक्कीच म्हणू शकतो, मात्र यात काही कंपन्या अश्याही होत्या ज्यांना घसरणीचा सामना करावा लागला(Share Market Closing). यामध्ये प्रामुख्याने Bharti Airtel, HDFC Life, ONCG, ICICI Bank, मारुती सुझुकी आणि Asian Paint चा समावेश होता. एकूण बाजारी दिवसात आज गुंतवणूकदारांनी 5.83 लाख कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे.