Share Market Closing: गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान; SmallCap मध्ये सर्वाधिक घसरण

Share Market Closing: माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार आजचा दिवस काही भारतीय शेअर बाजारासाठी खास नव्हता. आज म्हणजेच आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजारातील प्रमुख निर्देशांक म्हणजेच Sensex आणि Nifty च्या शेअर्समध्ये घट झालेली पाहायला मिळाली. याच परिणामी BSE चे Market Cap 12 लाख कोटी रुपयांवरून थेट 374 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्ष 2022 नंतर आज Small Capच्या शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली.

आज का घसरले शेअर्स? (Share Market Closing)

शेअर बाजार म्हटलं की काहीसा चढ उतार हा आलाच, मात्र यामुळे गुंतवणूकदारांवर बराच परिणाम होत असतो. आज म्हणजेच 13 मार्च रोजी बाजारात अशीच काहीशी घसरण झालेली पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) प्रमुख निर्देशांक Sensex 1,100 अंकांनी घसरून 73,000 च्या पातळीखाली आला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) Nifty निर्देशांक देखील 22,000 च्या पातळीखाली घसरला. त्यांनतर काहीशी चांगली बाजू दिसत असतानाही दिवसाच्या शेवटी Sensex 906.07 अंकांनी घसरून 72,761.89 च्या पातळीवर बंद झाला. Nifty 338.00 अंकांनी घसरून 21,997.70 च्या पातळीवर बंद झाला.

आज Smallcap ची स्थिती होती बिकट:

आजच्या संपूर्ण कार्यकारी दिवसांत Small Cap ची परिस्थिती सर्वात बिकट होती. असं म्हणतात की वर्ष 2022 नंतर आज Smallcap च्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे(Share Market Closing). आज Smallcap शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली, तर Midcap शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. शिवाय Microcap आणि SMC Stock Index मध्येही जवळपास 5 टक्क्यांची घसरण झाल्याने, BSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यात 12 लाख कोटी रुपयांची घट झाली.