Share Market Closing: शुक्रवारच्या सकाळी कमकुवत सुरुवात झालेल्या मुंबई शेयर बाजाराने दिवसाअखेर 167 अंकांची वाढ करत 71,595 च्या पातळीवर बाजाराचे दरवाजे बंद केले. राष्ट्रीय शेयर बाजाराचा निफ्टीही 64 अंकांची वाढ करत 21,782 च्या पातळीवर बंद झाला. शेयर बाजारात ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली, तर एसबीआय 3.6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
आज कशी होती बाजारी स्थिती? (Share Market Closing)
आजच्या शेअर बाजारात, Nifty बँक, Nifty फार्मा, Nifty FMCG आणि Nifty Financial Services या इंडेक्स व्यतिरिक्त इतर सर्व इंडेक्स लाल रंगात होते. Nifty Mid Cap, BSE Small Cap, Nifty IT आणि Nifty Auto इंडेक्समध्ये घसरण झाली. महत्वाचं म्हणजे आज इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि BPCL सारख्या मोठ्या तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही घसरण झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या नुकसानीमुळे गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या शेअर्सची विक्री केली, ज्यामुळे शेअर्सच्या किमतीत घसरण झाली.
आजच्या शेअर बाजारात, ग्रासिम इंडस्ट्रीज,SBI, अपोलो हॉस्पिटल, अदानी पोर्ट्स, सन फार्मा,ICICI Bank आणि हीरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा,ONGC, भारती एयरटेल,NTPC, हिंडाल्को, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांच्या शेअर्समध्ये(Share Market Closing) घसरण झाली आहे.