Share Market Closing: आशियाई बाजारांमध्ये चढउतार असताना आज स्थानिक बाजारात चांगली वाढ झाली आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू आले. दोन्ही प्रमुख निर्देशांक BSE Sensex आणि Nifty 50 अर्धा टक्क्यांपेक्षा अधिक वाढून बंद झाले. या वाढीमध्ये ब्रॉडर मार्केट आणि बँकिंग क्षेत्राच्या शेअर्सचा मोठा वाटा होता. परिणामी BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य वाढून 1.92 लाख कोटी रुपयांनी वाढले, गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मक तेजी आली आणि पुढील दिवसांतही ही तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे.
आज कसा होता बाजारी दिवस? (Share Market Closing)
आज शेअर बाजारात चांगली बातमी आहे. Nifty आणि Sensex दोन्ही निर्देशांक वाढून बंद झाले. Nifty 0.59 टक्क्यांनी वाढून 21,743.25 वर तर Sensex 0.68 टक्क्यांनी वाढून 71,555.19 वर बंद झाला. Nifty बँक निर्देशांक तर चक्क 1.38 टक्क्यांनी वधारला. आजचा शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी घेऊन आला आहे.
Sensex मधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. यामध्ये ICICI Bank, एक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली(Share Market Closing). त्यामुळे, या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले. मात्र, दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, M&M आणि टायटन यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
आज एकूण 3942 शेअर्सची देवाणघेवाण झाली. यापैकी 1716 शेअर्स वाढले तर 2136 घसरले आणि 90 आपल्या जागी कायम राहिले. विशेष म्हणजे, 228 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांवर पोहोचले आणि 68 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांवर आले. याशिवाय, आज 15 शेअर्स वरच्या सर्किटवर गेले तर 4 शेअर्स खालच्या सर्किटवर आले. याचा अर्थ, काही विशिष्ट शेअर्समध्ये आज मोठी चढउतार पाहायला मिळाली होती .