Share Market Closing: शेअर बाजारात आज जोरदार घसरण; गुंतवणूकदारांचे 6.22 लाख कोटींचे नुकसान

Share Market Closing: आज सकाळी सपाट सुरुवात झाल्यानंतर, शेअर बाजारात दिवसभरात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आणि नंतर प्रमुख बाजार निर्देशांक, Sensex आणि Nifty दोन्ही घसरले. Sensex सुमारे 790 अंकांनी घसरून 72,500च्या जवळ बंद झाला, तर Nifty 200 अंकांनी घसरून 22000 च्या खाली बंद झाला.

आज कसा होता बाजारी दिवस? (Share Market Closing)

आजच्या व्यवहारात, शेअर बाजारात मंदीचे वातावरण होते. यात सर्वाधिक घसरण ऊर्जा क्षेत्रात दिसून आली. Nifty Energy निर्देशांक 2.30 टक्क्यांनी घसरला. ONGC, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि पेट्रोनेट LNG सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

बँकिंग क्षेत्रातही आज मंदीचे वातावरण होते. Nifty Bank निर्देशांक 1.34 टक्क्यांनी घसरला. HDFC Bank, ICICI Bank, आणि SBI सारख्या बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. याशिवाय, ऑटो, IT, फार्मा, FMCG, मेटल, Consumer Durable, Healthcare, Oil आणि गॅस क्षेत्रातील शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

Paytm आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण:

बुधवारी, Paytm आणि अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली (Share Market Closing). Paytmचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून 544.15 वर बंद झाले, तर अदानी समूहातील अदानी एनर्जी सोल्युशन्स 4.52 टक्क्यांनी घसरून 233.80 वर आणि अदानी विल्मर 1.55 टक्क्यांनी घसरून 478.85 वर बंद झाले. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 6.22 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.