Share Market Closing: आज कशी होती बाजारातील शर्यत? कोणते शेअर्स ठरले विजयी?

Share Market Closing: 4 मार्च रोजी, म्हणजचे आज शेअर बाजारात उत्साही तेजीचे वातावरण होते. प्रमुख निर्देशांक Sensex आणि Nifty दोन्ही वाढीसह बंद झाले. Sensex 66 अंकांनी वाढून 73,872 च्या पातळीवर पोहोचला, तर Nifty ने 61 अंकांची उडी घेत 22,400 ची पातळी गाठली. दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये Nifty ने 22,440 चा विक्रमी उच्चांकही गाठला.

असा होता आजचा दिवस: (Share Market Closing)

आजच्या शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. याउलट, IT, FMCG आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. Mid Cap शेअर्स तेजीत राहिले तर Small Cap शेअर्स घसरणीसह बंद झाले. Sensex मधील 30 पैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि Niftyच्या 50 पैकी 24 शेअर्स वाढीसह आणि 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

HDFC Bank, रिलायन्स इंडस्ट्रीज,NTPC, ICICI Bank आणि पॉवर ग्रिड यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर टाटा स्टील आणि SBIचे शेअर घसरले. बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज आणि HDFC Life चे शेअर्सही वाढले. महिंद्रा, ब्रिटानिया, अपोलो हॉस्पिटल आणि LTI Mind Tree यांचे शेअर्स घसरले (Share Market Closing). आजच्या दिवसात BSE मध्ये मोठी घसरण झाली असून बाजाराचे एकूण मार्केट कॅप 31,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.