Share Market Closing: Nifty आणि Sensex आज बढतीसह बंद; गुंतवणूकदारांनी केली कोटींची कमाई

Share Market Closing: जागतिक बाजारातून आलेल्या चांगल्या संकेतांमुळे आज स्थानिक बाजारात जोश होता. सुरवातीला BSE Sensex आणि Nifty50 हे निर्देशांक थोडे अस्थिर होते पण दुपार नंतर त्यांनी जोर धरला आणि चांगल्या वाढीच्या सोबत बंद झाले. FMCG, मीडिया आणि फार्मा या क्षेत्रांशिवाय बाकी सगळ क्षेत्रांनी बाजाराला पाठिंबा दिला. एकूणच बाजारातील तेजीमुळे BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 2.61 लाख कोटी रुपयांनी वाढले आणि त्याचप्रमाणे गुंतवणदारांनाही याचा बऱ्यापैकी फायदा कमावण्याची संधी मिळाली.

आज कशी होती बाजारी स्थिती? (Share Market Closing)

शेअर बाजारात आज चांगली वाढ झाली. Sensex 227.55 अंकांनी वाढून बंद झाला तर Nifty 50 ही 70.70 अंकांनी वाढून बंद झाला होता. Nifty Bank तर 0.68 टक्क्यांनी वाढला, त्यामुळे गुंतवणूदारांची संपत्ती वाढली आहे. आजच्या वाढीनंतर BSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल 3,87,35,750.33 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच, गुंतवणूदारांची संपत्ती आज 2,60,909.57 कोटी रुपयांनी वाढली आहे.

आजच्या दिवशी Sensex मधले 30 पैकी 16 शेअर्स हिरव्या झेंड्याखाली बंद झाले. सर्वात मोठी वाढ आज M&M, NTPC आणि पॉवर ग्रिडमध्ये झाली. मात्र, दुसरीकडे एक्सिस बँक, ITC आणि IBU यांच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. थोडक्यात, आजचा बाजार काही क्षेत्रांसाठी आनंददायक तर काहींसाठी निराशाजनक राहिला(Share Market Closing).

BSE च्या माहितीनुसार एकूण 3938 शेअर्सपैकी 2355 वाढले, तर 1503 घसरले आणि 80 मध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय, 311 कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले, तर 30 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या निम्न पातळीवर आले. त्याचबरोबर, 403 कंपन्यांचे शेअर्स वरच्या सर्किटवर पोहोचले तर 299 कंपन्यांचे शेअर्स खालच्या सर्किटवर बंद झाले.