Share Market Closing: आज शेअर बाजारात तेजी; Sensex 73,000 वर थांबला

Share Market Closing: मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. माहिती तंत्रज्ञान (IT), औषध (Pharma) आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी दिसून आली. यामुळे, बाजाराचा प्रमुख निर्देशांक Sensex 305 अंकांनी वाढून 73,095 पातळीवर बंद झाला. तर, दुसरा प्रमुख निर्देशांक Nifty 76 अंकांनी वाढून 22,198 पातळीवर पोहोचला.

आज कशी होती बाजारी स्थिती? (Share Market Closing)

आजच्या शेअर बाजारात मिश्रित ट्रेंड दिसून आला. Auto, IT, Pharma, धातू, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स, Infra, Healthcare आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर तेल आणि गॅस, ऊर्जा आणि माध्यम क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. Niftyचा मिडकॅप निर्देशांक घसरला, तर Sensexमधील 30 पैकी 23 शेअर्स वाढीसह बंद झाले. Niftyच्या 50 पैकी 29 शेअर्स वाढीसह आणि 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Hero MotoCorp, Bajaj Finance, SBI, Divi’s Labs, Bajaj Finserv, UPL आणि Adani Enterprises सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर दुसरीकडे, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, सन फार्मा, सिप्ला, महिंद्रा, रिलायन्स आणि SBI लाईफ यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप 391.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 392.05 लाख कोटी रुपये होते(Share Market Closing). आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 8,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.