Share Market Closing: सोमवारी म्हणजे आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली नाही. Banking, ऑटो, फायनान्स, FMCG, धातू, रिअल इस्टेट आणि Oil and Gas यासारख्या प्रमुख क्षेत्रातील नफा बुकिंगमुळे बाजारात मोठी घसरण झाली आणि आजच्या संपूर्ण दिवसांत अशीच घसरण होत राहिली आणि शेवटी Sensex 523 अंकांनी घसरून 71,073 वर बंद झाला. Nifty ही 166.45 अंकांनी घसरून 21,616 च्या पातळीवर बंद झाला.
आजचा बाजारी दिवस कसा होता? (Share Market Closing)
Nifty Midcap 100, BSE Small Cap, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि Nifty Financial Services यासह अनेक प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मात्र, Nifty IT आणि Nifty Pharma निर्देशांक यांना वाढीचा लाभ मिळाला. आजचा दिवस घसरणीचा असला तरीही अनेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली, यात डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल, डिवीज लॅब, विप्रो, HCL Tech, महिंद्रा अँड महिंद्रा आणि LTIMindtree यांचा समावेश होता.
एवढंच नाही तर डिवीज लॅब आणि विप्रो यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली तेजी होती. दुसरीकडे, अदानी समूहाच्या 10 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, म्हणजेच समूहाच्या फक्त दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे(Share Market Closing). बाकी कंपन्यांवर नजर फिरवायची झाल्यास कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, ONGC, टाटा स्टील, NTPC शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत.