Share Market Closing: आजच्या दिवसात शेअर बाजारात उत्साहवर्धक वातावरण होते. BSE SEnsex 440 अंकांच्या वाढीसह 72085 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा Nifty सुमारे 157 अंकांच्या वाढीसह 21854 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी, शेअर बाजारात उत्साही वातावरण होते आणि अनेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. यातच, बीपीसीएल (BPCL) च्या शेअर्समध्ये दिवसभरात 10 टक्क्यांची उड्डाण घेत 558 रुपयांची पातळी गाठली. पॉवर ग्रिड, ONCG आणि अदानी पोर्ट्स सारख्या इतर दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली,यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.
आज काय होती बाजारी परिस्थिती?(Share Market Closing)
आजच्या बाजारात एक विचित्र चित्र पाहायला मिळालं. निफ्टी बँक निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीसह बंद झाले. निफ्टी MFCG आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस(Nifty Financial Services) यांच्यासह बँकिंग क्षेत्रात घसरण दिसून आली, तर Nifty Mid Cap 100, BSE Small Cap, Nifty IT, Nifty Auto आणि Nifty Pharma यांनी चांगली कामगिरी करत वाढ दर्शविली.
शेअर मार्केटमध्ये आयशर मोटर्स, ॲक्सिस बँक, HDFC लाईफ, HDFC बँक, HUL, लार्सन अँड टुब्रो आणि ITC यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर BPCL, पॉवर ग्रिड, ONCG, NTPC, टाटा कंझ्युमर आणि TCS, अदानी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.
गुंतवणूकदारांनी किती फायदा कमावला?
आजच्या दिवशी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते आणि BSE वरील कंपन्यांचे बाजार भांडवल 382.74 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. कालच्या सत्रात बाजार भांडवल 379.42 लाख कोटी रुपये होते, याचा अर्थ आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.32 लाख कोटी रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे(Share Market Closing).