Share Market Closing: आजच्या दिवसभरात शेअर बाजारात उत्साही वाढ दिसून आली. प्रमुख निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले. Sensex 195 अंकांनी वाढून 72,500 च्या पातळीवर पोहोचला, तर Nifty 31 अंकांनी वाढून 21,982 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली. दुसरीकडे, IT आणि हेल्थकेअर देखील संपूर्ण दिवसांत मागे नव्हते.
आजचे वातावरण सकारात्मक: (Share Market Closing)
आज शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. Nifty Mid cap 100, BSE Small cap, Nifty IT, Nifty Bank, Nifty Auto, Nifty Pharma, Nifty FMCG आणि Nifty Financial Services या प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ झाली.
तेजीच्या बाजारात अदानी एंटरप्रायझेस, टाटा कंझ्युमर, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, ब्रिटानिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिड यांच्यासारख्या कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर होते. दुसरीकडे, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, LTI माइंडट्री, Divi’s Lab आणि HUL सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
Paytmचे शेअर्स घसरले:
आजच्या दिवसांतली सर्वात महत्वाची बातमी म्हणजे Softbank Groupने Paytmमधील 2.17 टक्के हिस्सा विकल्याची घोषणा केली असल्याने Paytmच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सध्या One97 Communications (Paytmची मूळ कंपनी) च्या शेअर्समध्ये 4.38 टक्क्यांची घसरण होऊन ते 388.40 वर व्यवहार करत आहेत. आणि सर्वात शेवटी आजच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे(Share Market Closing). ही निश्चितच एका दिवसात झालेली प्रचंड वाढ असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.