बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल नोकरीचे सगळीकडे वांदे असल्याने अनेक तरुणांचा कल हा शेअर मार्केटकडे (Share Market) वळत आहे. शेअर मार्केट म्हंटल कि त्यात रिस्क आली, चढउतार आलेच. कधी कोणता शेअर वर जाईल आणि कधी कोणता शेअर मंदीत येईल हे सांगणं तस कठीणच. परंतु असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना चांगलंच मालामाल केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने गेल्या १५ वर्षात आपल्या गुंतवणूकदाराना तब्बल 1044.72 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीचं नाव गांधी स्पेशल ट्यूब लिमिटेड'(Gandhi Special Tubes Ltd) असं आहे. :
गांधी स्पेशल ट्यूब लिमिटेड ही कंपनी वर्ष 2007 पासून आपल्याला स्टोक एक्सचेंजच्या लिस्ट मध्ये पाहायला मिळते. ही कंपनी सीमलेस स्टील ट्यूब, वेल्टेड स्टील ट्यूब, कपलिंग नट आणि फ्युअल एक्सचेंज ट्यूब तयार करते. या नावाची अजून एकही कंपनी देशात नसल्यामुळे त्यांना ‘ गांधी स्टोक ‘(Gandhi Special Return) म्हणून ओळखलं जातं. आता आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्यामुळे कंपनीचं नाव चर्चेत आहे.
गांधी स्टोकने दिलाय मोठा परतावा (Share Market)
गेल्या पंधरा वर्षात दमदार कामगिरी करत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले आहे. मोठा परतावा दिल्यामुळे या नावाची चर्चा सगळीकडे केली जात आहे. वर्ष 2008 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 59.70 रुपये होती, जी यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 683.40 रुपये एवढी वाढली आहे. विचार केला तर गेल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1044.72 टक्क्यांचा मोठा रिटर्न दिला आहे. मागच्या पाच वर्षांचा हिशोब पहिला तर आकडा 98.26 टक्के आहे तर केवळ सहा महिन्यांत कंपनीने 38.14 टक्क्यांचा विक्रम गाठला आहे. उदाहरणार्थ मागच्या पंधरा वर्षांपासून कंपनी सोबत गुंतवणूक केलेल्या माणसाने जर १ लाख रुपये गुंतवले असते तर आज 1675 शेअर्स नुसार त्याचे 11.44 लाख रुपये झाले असते.