Share Market: शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञांचा वापर; SEBI आणि Ai ची हातमिळवणी

Share Market: शेअर बाजारात फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बाजार नियामक SEBI पूर्ण तयारी करत आहे. त्यामुळे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्यांना लवकर पकडले जाईल आणि बाजारात गैरव्यवहारही रोखले जातील. विशेष म्हणजे, आता SEBI या फसव्या दलालांना पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करत असल्याची माहिती समोर आली.

फसवेगिरी रोखण्यासाठी Ai चा वापर: (Share Market)

PTI नुसार SEBI चे अधिकारी कमलेश वर्ष्णेय यांनी म्हटले आहे की “फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी तपासात SEBI कडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा केला जातोय आणि याशिवाय इतर अनेक हेतू सध्या करण्यासाठी नवीन प्रणाली मदत करत आहे.” सोमवारी, 26 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज सदस्य संघटनेच्या (ANMI) 13 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान, कमलेश वर्ष्णेय यांनी SEBI द्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याबद्दल महत्त्वाची माहिती सामायिक केली.

या परिषदेत SEBI ची बाजारपेठेतील निष्पक्ष व्यापार वातावरण राखण्याची भूमिका, बाजारपेठीची पारदर्शकता आणि हेरफेरी रोखण्याचे महत्त्व, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि हेरफेरी रोखण्यासाठी घेतलेल्या इतर उपाय यांची माहिती देण्यात आली(Share Market). SEBI ने गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी, गुंतवणूकदारांचा विश्वास राखण्यासाठी आणि बाजारपेठेतील पारदर्शकता राखण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत, असेही वर्ष्णेय यांनी दरम्यान नमूद केले होते.