Share Market: तुम्हाला देखील येणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता वाटत आहे ना? नक्कीच असले कारण या बजेटमधून कोणाला किती फायदा होईल याकडे प्रत्येकाचंच लक्ष आहे, नाही का?! आपला शेअर बाजार सुद्धा या बजेटकडे नजर लावून बसलाय, मात्र शेअर बाजाराला बजेटचा फायदा काय? अगदीच सोप्या भाष्येत सांगायचं म्हणजे बजेट आपल्याला आर्थिक नियोजनाबद्ल माहिती देतं, एकार्थाने ते आपल्या देशाचं आर्थिक नियोजनच आहे आणि याच परिणाम देशातील प्रत्येक घटकावर होत असतो, ज्याला शेअर बाजार अपवाद ठरत नाही. बाजारातील तज्ञांच्या मते शेअर बाजारात काही कंपन्यांच्या शेअर्सवर आता खास नजर ठेवावी लागणार आहे, कारण येणाऱ्या बजेटसोबत या शेअर्समध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळतील.
कोणत्या शेअर्सवर लक्ष द्याल? (Share Market)
तुम्हाला शेअर बाजाराबद्दल खास रुची असले तर बजेट सादर होण्यापूर्वी काही महत्वाच्या कंपन्यांकडे नक्कीच लक्ष द्या, कारण या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ होऊ शकण्याचा अंदाज काही तज्ञांकडून व्यक्त केला गेलाय. देशात आता सदर होणाऱ्या बजेटला अंतरिम बजेट म्हणावं लागेल कारण ते काही काळासाठीच वैध असणार आहे, 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट देशासमोर ठेवणार आहेत, मात्र बजेट सादर होण्याआधी या कंपन्यांच्या स्टॉकवर लक्ष द्यायला विसरू नका…
१) गोदरेज प्रॉपर्टीज: या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 3.52 टक्क्यांनी वाढले आहेत, आणि एका महिन्याचा आकडा पहिला तर यात 18.63 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळते. कंपनीच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांतील परताव्यांनी खरोखरच गुंतवणूकदारांना प्रभावित केलं आहे. 36.45 टक्क्यांची वाढ ही थक्क करणारी आहे, तर गेल्या वर्षभरात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून या शेअरने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत, हा शेअर 18.63 टक्क्यांनी वाढला आहे, जो या कंपनीच्या मजबूत कामगिरीचा स्पष्ट पुरावा म्हणावा लागेल.
२) TCS शेअर्स: TCS म्हणजे Tata Consultancy Services, ही रतन टाटा यांच्याकडून पायंडा रोवण्यात आलेली आपल्या देशातील एक जुनी आणि अनुभवी कंपनी आहे. मागच्या पाच दिवसांच्या तुलनेत टीसीएसच्या शेअर्समध्ये 1.68 टक्क्यांची घसरण दिसून आली, परंतु गेल्या महिन्यात त्यांची वाढ फक्त 1 टक्के एवढीच होती. मध्यम आणि दीर्घकालीन कामगिरीचा विचार करता, शेअरने उत्कृष्ट परतावा देऊ केले आहेत. गेल्या सहा महिन्यांत 12.17 टाक्यांची वाढ, तर गेल्या वर्षात 11.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरमध्ये फक्त 0.70 टक्क्यांची वाढ झाली. एकंदरीत गेल्या पाच दिवसांत हे शेअर खाली आले असले तरी त्यांची दीर्घकालीन कामगिरी उत्तम आहे.
३) इन्फोसिस: मागच्या पाच दिवसांमध्ये इन्फोसिसच्या शेअर्समध्ये फक्त 1 टक्क्याची वाढ झाली आहे, परंतु गेल्या महिन्यात यात जवळपास 7.75 टक्क्यांची वाढ झाली होती. दीर्घ आणि मधल्या मुदतीचा विचार करता, या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत 23.30 टक्के आणि गेल्या वर्षात जवळपास 9 टक्के एवढा प्रभावी परतावा दिले आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत या स्टॉकने 7.75 टक्क्यांपेक्षा जास्ती वाढ नोंदवली आहे.
४) विप्रो: विप्रोचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 1 टक्क्यापेक्षा जास्त खाली आले आहेत, परंतु गेल्या महिन्यात ते जवळपास स्थिर होते. दीर्घ आणि मध्यावधीच्या कालावधीचा विचार करता, स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 18.03 टक्के आणि गेल्या वर्षात जवळपास 19 टक्क्यांचा प्रभावी परतावा दाखवला आहे(Share Market). वर्षाच्या सुरुवातीपासून हा स्टॉक 1 टक्क्यापेक्षा जास्त वाढला. विप्रोचे शेअर्स गेल्या काही दिवसांत थोडे खाली आले, पण दीर्घ आणि मध्यावधीच्या कालावधीचा विचार करता, स्टॉकने चांगला परतावा दिलाय हे विसरून चालणार नाही.