Share Market: कालच्या विक्रमी परिक्रमानंतर आज देखील बाजाराने पुन्हा बाजी मारली. कालच्या विक्रमानंतर आज पुन्हा मोठी उलाढाल होईल अशी कोणाला अपेक्षा नव्हती तरीही आज BSEचा Sensex 33.40 अंकांनी म्हणजे जेमतेम 0.05 टक्क्यांनी वाढून 74,119.39 च्या पातळीवर बंद झाला आणि Nifty 50 सुद्धा 19.50 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी वर चढून 22,493.55 वर बंद झाला. पण यापेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे आज Mid Cap आणि Small Cap कंपन्यांच्या निर्देशांकांमध्ये चांगलीच वाढ झाली.
आज कशी होती बाजारी परिस्थिती? (Share Market)
आजच्या शेअर बाजारात काहीशी मिश्रित अवस्था पाहायला मिळाली होती. तेल आणि वायू कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर दुसरीकडे Nifty FMCG च्या शेअर्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली. टाटा कंज्यूमर आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बजाज ऑटोच्या शेअर्समध्येही 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर UPL, JSW स्टील आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढले.
हे अंक पाहून असं नक्कीच समजू नका की सर्व कंपन्या या वाढीच्या भागीदार होत्या (Share Market). आजच्या शेअर बाजारात महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली तर भारत पेट्रोलियमच्या शेअर्समध्ये 2.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही 1.6 टक्क्यांची घसरण झाली. मात्र या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज IIFL फायनान्सचे शेअर्सही 10 टक्क्यांनी वाढले आहेत.