Share Market Holiday: मार्च महिन्यात 6 दिवस शेअर बाजार बंद; मात्र कारण तरी काय?

Share Market Holiday: आपल्याकडे शेअर बाजाराबद्दल आजकाल बरंच आकर्षण वाढत आहे, काही दिवसांपूर्वी जिथे लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी भरपूर विचार करत असत तिथे आज बऱ्यापैकी जागरूकता वाढत आहे. म्हणावं तसा अजूनही प्रतिसाद मिळत नसला तरीही बऱ्यापैकी लोकं शेअर बाजाराबद्दल जाणून घेण्यात उत्सुकता दाखवत आहेत आणि म्हणूनच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरते, कारण या महिन्यात शेअर बाजार एकूण सहा दिवसांसाठी बंद राहणार आहे.

शेअर बाजार बंद का? (Share Market Holiday)

शेअर बाजाराबद्दल बोलायचं झालं तर आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी बाजाराची सुट्टी असते आणि या दिवशी BSE आणि NSE वर कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला जात नाही. मात्र या मार्च महिन्यात राहिलेल्या 11 दिवसांमध्ये भारतातील शेअर बाजार सहा दिवसांसाठी बंद असेल, ज्यात काही दिवस हे साप्ताहीक सुट्ट्यांचे असतील आणि बाकी दोन दिवस इतर कारणास्तव बाजार बंद राहील.

बाजाराच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार Equity Segment, Equity Derivative Segment आणि SLB Segment मधील सर्व ट्रेडिंग मार्चमधील या दोन दिवशी शेअर बाजारात बंद राहतील (Share Market Holiday). कारण 25 मार्च रोजी देशात होळी साजरी केली जाईल आणि 29 तारखेला देशात गुड फ्रायडे साजरा केला जाणार आहे. यामध्ये लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे MCX वर संध्याकाळच्या सत्रासाठी ट्रेडिंग सुरू असेल Commodity Derivative Segment आणि Electronic Gold Receipt (EGR) Segment मध्ये संध्याकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत ट्रेडिंग सुरू राहील.