Share Market Holidays: शेअर बाजाराबद्दल जाणून घेण्यात इच्छुक असणाऱ्या सर्वांसाठी आजची ही बातमी सर्वात महत्वाची आहे, कारण या आठवड्यात शेअर बाजार केवळ तीन दिवसांसाठी कामकाज सुरु ठेवेल आणि बाकी दिवशी काही कारणास्तव बाजार बंद राहणार आहे. या अगोदर देखील म्हटल्याप्रमाणे आजकाल शेअर बाजाराबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता जागरूक होत आहे आणि म्हणूनच ही बातमी देखील महत्वाची ठरते.
शेअर बाजार बंद कशाला? (Share Market Holidays)
लक्ष्यात घ्या यावेळी देशात सणासुदीचा काळ सुरु आहे. आजच देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला आणि म्हणून शेअर बाजार देखील बंद होता. बाकी या आठवड्यात शुक्रवारी Good Friday साजरा केला जाणार असल्याने शेअर बाजार पुन्हा बंद असेल, आणि शनिवार रविवार हे दोन्ही दिवस बाजार नियमांप्रमाणे बंद असल्याने या आठवड्यात केवळ तीन दिवसांसाठी बाजारातील कामकाज केले जाईल. येत्या शुक्रवारी MCX आणि NCDEX या दोन्ही ठिकाणी व्यवहार बंद राहणार आहेत.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या वर्षात शेअर बाजार तब्बल 14 दिवसांसाठी बंद राहील(Share Market Holidays). येणाऱ्या एप्रिल महिन्यात राम नवमी आणि ईदाच्या निमित्ताने बाजार बंद ठेवला जाईल. बाकी दिवाळीच्या काळात येणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंग बदल हळूहळू माहिती स्प्ष्ट होईल.