बिझनेसनामा ऑनलाईन (Share Market) | शेअर बाजारात आज सुरवातीच्या पडझडी नंतर सकारात्मक वाटचाल करत ऐतिहासिक 62000 अंकांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला आहे. यामध्ये अडाणी समूहाचा सिंहाचा वाटा आहे. आज पुन्हा एकदा अदानी समूहातील गुंतवणूकदारांच्या खेरेदीमुळे शेअर बाजाराला सुरवातीच्या पडझडीनंतर सकारत्मक दिशेने मार्गक्रमण करणे शक्य झाले आहे.
अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये सर्किट आज गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याने अदानी समूहाच्या शेअर्सनी आज जबरदस्त मुसंडी मारत शेअर बाजारातील गुंतवणूक सकारात्मक ठेवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. परिणामी आज सेन्सेक्स 186 अंकांच्या वाढीसह 61916 वर पोहोचला आहे. त्याचवेळी निफ्टी 80 अंकांच्या उसळीसह 18283 वर पोहोचला आहे. निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये अदानी एंटरप्रायझेस 9.56 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स 7.07 टक्क्यांनी वधारले आहेत. तर, डिविज लॅब, सन फार्मा आणि बजाज ऑटो इत्यादी शेअर्स देखील समाधानकारक वाटचाल करत आहेत.
2000 रुपयांच्या नोटांचा प्रभाव
गेल्या आठवड्याच्या अखेरीस 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याच्या बातमीने आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तशी काहीशी कमजोर झाली. ज्यामुळे आज सकाळी सेन्सेक्स सुमारे 150 अंकांच्या घसरणीसह 61556 पातळीवर उघडला. तर निफ्टीने 18201 च्या पातळीपासून व्यवहार सुरू केले. सुरुवातीच्या व्यवहारातील घसरणीतून सावरल्यानंतर सेन्सेक्स 68 अंकांनी वधारत 61798 स्तरावर होता. तर निफ्टी 38 अंकांच्या वाढीसह 18241 च्या पातळीवर आला आहे. (Share Market)
आज अदानी समूहाच्या 10 पैकी 10 कंपन्यांचे शेअर्स उंच भरारी घेत आहेत. अदानी टोटल आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये अप्पर सर्किट आहे. एनडीटीव्ही, अदानी ग्रीन आणि अदानी पॉवरमध्येही अप्पर सर्किट बसवण्यात आले आहे. अदानी विल्मारची 6 टक्क्यांहून अधिक उसळी आहे. एसीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंटही हिरव्यागार आहेत.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, पॉवर ग्रिड आणि टायटन हे शेअर्स निफ्टीमध्ये उसळत होते तर एशियन पेंट्स, कोटक बँक, हिंदाल्को, कोल इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा ह्या शेअर्स चे दर घसरत होते तर दुसरीकडे, सेक्टरेल इंडेक्समध्ये निफ्टी ऑटो, आयटी, मेटल, पीएसयू बँक, रियल्टी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक घोडदौड सुरु ठेवली आहे.