बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय शेअर मार्केटमध्ये आज आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 223 अंकांनी घसरला. तर त्याचवेळी निफ्टीमध्येही 71 अंकांची घसरण होऊन व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 18,563.40 वर बंद झाला. जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर मार्केट मध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.
Sensex चे कोणते शेअर्स वधारले अन कोणते घसरले-
आजच्या व्यवहाराच्या दिवशी BSE चा 30 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 223.01 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी घसरून 62,625.63 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंट हे टॉप शेअर्स वधारले तर त्याचवेळी इन्फोसिस, टाटा स्टील, sbi , एचयूएल, एचसीएल टेक यांच्या शेअर्स मध्ये घसरण पाहायला मिळाली. आज टाटाच्या शेअर्सचे सर्वाधिक नुकसान पाहायला मिळालं.
निफ्टी 18,563.40 वर बंद-
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीमध्ये 71.15 अंकांची म्हणजेच 0.38 टक्क्यांची घसरण झाली. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 18,563.40 वर बंद झाला. निफ्टी बाबत सांगायचं झाल्यास आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन , इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एल अँड टी, हे निफ्टी वाढले तर त्याचवेळी डिव्हिस लॅबोरेटरीज, हिरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ आणि हे शेअर्स मध्ये घसरण पाहायला मिळाली.