Share Market : देशात 2023 च्या अखेरीला आणि 2024 च्या सुरुवातीला सुरु असलेल्या निवडणुका या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असल्याच्या चर्चा सुरुवातीपासूनच केल्या जात होत्या. त्यामुळे यंदाचं हे वर्ष निश्चितच निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी या निवडणुका होत असल्याने यांच्याकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय आजच्या शेअर बाजारासाठी खास ठरणार आहे, तसेच याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो. निवडणुकांच्या आधी एक्झिट पोलने काही वेगळ्या आकड्यांचा अंदाज लावला होता. एक्सिट पोलच्या अंदाजे तेलंगणा आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये कॉंग्रेसचा विजय अपेक्षित होता, मात्र समोर आलेल्या निकालानंतर सगळंच चित्र बदलून गेलं आहे. हा निकाल विद्यमान भाजप सरकारसाठी चांगले टेलविंड प्रदान करेल असे मोतीलाल ओसवाल सेक्युरिटीज यांचे मत आहे.
निवडणुकांचा शेअर बाजारावर काय परिणाम? Share Market
देशातील विविध राज्यांत चालेल्या निवडणुकांमध्ये अद्याप भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे, त्यामुळे StoxBoxचे संशोधन प्रमुख मनीष चौधरी यांनी आज म्हणजेच सोमवारी 200- 250 च्या अंकांनी निफ्टी उघडण्याचा अंदाज लावला आहे. येणाऱ्या 2024 निवडणुकांच्याआधी भारतीय बाजारपेठेत वाढ होण्याचा संकेत देखील त्यांनी दर्शविला आहे. भाजप सरकारच्या विजयानंतर सरकारवरचा विश्वास अजून दृढ होईल आणि म्हणूनच बाजारातील आकड्यांमध्ये तुफानीने वाढ व्हायला मदत होणार आहे. फिलीप कॅपिटलच्या मते सध्या FY24/25 साठी निफ्टी EPSची वाढ प्रत्येकी 18 टक्क्यांनी होणं अपेक्षित आहे.
भारत GDP आणि कोर्पोरेट दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवत आहे, आणि आता जाहीर होणारा निकाल हा व्यावहारिक बाजारपेठेला अजून जास्ती आत्मविश्वास मिळवायला मदत करेल. देशात सत्याताने प्रस्थापित होणारी राजकीय सत्ता मेक्रो आणि धोरणात्मक गती कायम ठेवण्यासाठी चांगला संकेत आहे. या विजानंतर (State Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढणार आहे. हिंदी प्रदेशात मिळवलेल्या या विजयाचा सकारात्मक परिणाम इतर राज्यांवरही दिसून येईल. तसेच यानंतर अनेक भागांमध कॉंग्रेसची स्थती कमकुवत होऊ शकते असा अंदाज ब्रोक्रेजने वर्तवल आहे.
विश्लेषक काय म्हणतात?
महागाईच्या वाढत्या दबावामुळे ग्रामीण भागातून बाजाराला मिळणारी मागणी कमकुवत झाली आहे. येणाऱ्या काळात भाजप सरकारकडून या ग्रामीण प्रदेशात अधिकाधिक योजना राबवल्या जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. Share Market मध्ये सध्या मोतीलाल सेक्युरिटीजनी स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड, एक्सिस बँक लिमिटेड, महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेड, हिरो मोटो कॉर्प लिमिटेड, लार्सन एंड टूर्बो लिमिटेड, अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड आणि इंडियन हॉटेल्स लिमिटेड बद्दल पसंती नोंदवली आहे. तसेच एन्टिक स्टोक ब्रोकिंग सध्या औद्योगिक , सौरक्षण,रेल्वे, वित्तीय, रियाल इस्टेट आणि सिमेंटच्या क्षेत्रांमध्ये इच्छुक आहेत.