Share Market : गेल्या आठवड्यात Reliance आणि TCS ला सर्वाधिक तोटा

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट म्हणलं कि चढ उतार पाहायला मिळतात. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठा तोटा सहन करावा लागला. यावेळी 10 पैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 70,486.95 कोटी रुपयांनी घसरले. यामध्ये Reliance इंडस्ट्रीज आणि TCS ला सर्वाधिक फटका बसला आहे. बाजारातील घसरणीचे कारण शेअर बाजारातील कमजोर कल असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या आठवड्यात बाजारात बरीच अस्थिरता दिसून आली आणि सेन्सेक्स 298.22 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी घसरून 61,729.68 वर बंद झाला. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि एचडीएफसी यांचे बाजार भांडवल समीक्षाधीन आठवड्यात घसरले, तर आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य मात्र वाढल्याचे पहायला मिळालं .

रिलायन्स इंडस्ट्रीजचे एम-कॅप रु. 27,941.49 कोटींनी घसरून 16,52,702.63 कोटी रुपये झाला तर TCS चे मार्केट कॅप 19,027.06 कोटींनी घसरून रु. 11,78,854.88 कोटी झाला. HDFC चे मार्केट कॅप रु. 10,527.02 कोटींनी घसरून रु. 9,20,568.10 कोटींवर घसरून 4,99,848.62 कोटी पर्यंत आला .