Share Market Closing: शनिवारीच्या विशेष ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला आणि Nifty पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर बंद झाला. Nifty ने आज 22462 चा उच्चांक गाठला, तर Sensex 74220 पर्यंत पोहोचला.
आजच्या बाजारात शेअर्सची दमदार वाढ: (Share Market Special Session)
आजच्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स, L&T हीरो मोटो कॉर्प आणि अदानी पोर्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. टाटा स्टील 3.50 टक्क्यांनी वाढला, तर इतर कंपन्यांनीही चांगली कामगिरी केली.
केवळ हेच नाही तर मेटल, फार्मा, बँकिंग, ऑटो, IT, FMCG आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस यांसारख्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये आज तेजीचे वातावरण होते. आज बाजारातील प्रत्येक क्षेत्रात खरेदीचे प्रमाण दिसून आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला.
विशेष ट्रेडिंगच्या बाबतीत काय झालं?
आज National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) मध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. हे सत्र एक्सचेंजेसने तयार केलेल्या Disaster Recovery Siteची चाचणी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रात, NSE आणि BSE दोन्ही एका तासासाठी बंद होते. या काळात, NSE ने Intra Day switch over करून Recovery Site वर यशस्वीरित्या ट्रेडिंग केलं.
24 फेब्रुवारी 2021 रोजी काय घडलं?
24 फेब्रुवारी 2021 रोजी NSE मध्ये तांत्रिक समस्यांमुळे ट्रेडिंग थांबवण्यात आलं होतं, यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला(Share Market Special Session). या घटनेमुळे Disaster Recovery Siteची आवश्यकता अधोरेखित झाली.