Share Market Today: होळीनंतर बाजाराचा रंग फिका; Sensex-Nifty घसरणीसह बंद

Share Market Today: कालचा दिवस आपण होळीच्या जल्लोषात साजरा केला, मात्र हा आनंद काही शेअर बाजाराला मानवणारा नव्हता. आज सकाळी शेअर बाजार उघडताच Sensex मध्ये 0.3 टक्क्यांची घसरण होऊन तो 72,554.59 अंकांवर जाऊन पोहोचला. एवढंच नाही तर Nifty मध्ये देखील 36 अंकांची घसरण झाल्याने तो 22,060 वर जाऊन पोहोचला होता. यासोबतच Bank Nifty मध्ये देखील 148 अंकांची घसरण होऊन तो 46,714 वर जाऊन पोहोचला होता.

आज कसा होता बाजारी दिवस? (Share Market Today)

आजचा दिवस शेअर बाजारासाठी अजिबातच खास ठरला नाही. दिवसभरात Sensex आणि Nifty ला बऱ्यापैकी लढत द्यावी लागली होती. या परिणामी BSE वर कार्यरत असलेल्या कंपनीच्या भांडवलात 7000 कोटी रुपयांची घसरण झाली. या कठीण काळात निफ्टीवरच्या HDFC Life, Tata Motors, HCL, Bajaj Motors यांसारख्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आलेली पाहायला मिळाली.

आज बाजारासाठी दिवस खराब ठरला असला तरीही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे(Share Market Today). आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 39,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, मात्र तरीही बाजार बंद होताना Sensex -361.64 अंकांच्या घसरणीसह 72,470.30 वर बंद झाला तर दुसऱ्या बाजूला Nifty 92.05 अंकांच्या घसरणीसह 22,004.70 वर बंद झाला.