Share Market Today: शेअर बाजारावर नजर ठेऊन असणाऱ्यांसाठी आज आम्ही पुन्हा एकदा महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शेअर बाजार म्हटलं की चढ आणि उतार हा भाग आलाच, त्यामुळे एखादे दिवशी काही कारणास्तव कंपन्यांचे भाव चढतात तर दुसऱ्या क्षणाला उतरतात देखील. आजच्या बाजारात कंपन्यांनी जोमाने खरेदी-विक्री केल्यानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आपल्या भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक आज 1-1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहेत.
आज कशी होती बाजाराची स्थिती? (Share Market Today)
वरती म्हटल्याप्रमाणे आज बाजाराच्या दोन्ही निर्देशकांत घसरण झाली, परिणामी Sensex 72,012.0 च्या पातळीवर तर Nifty-50 21817 च्या पातळीवर बंद झाला. दुसऱ्या बाजूला आज Nifty Midcap निर्देशांक 1.28 टक्क्यांची घट झाली तर BSE Small Cap मध्ये एका टक्क्याची घसरण झाली होती.
सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्स घसरले. बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँक या दोन दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बजाज फायनान्स 1.38 टक्क्यांनी तर कोटक महिंद्रा बँक 0.57 टक्क्यांनी वाढीसह बंद झाला. ICICI बँक आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्समध्येही थोडी वाढ झाली(Share Market Today), जी अनुक्रमे 0.26 टक्के आणि 0.23 टक्के अशी आहे.
आजच्या दिवसात BSE मधील कंपन्यांच्या Market Cap मध्ये मोठी घसरण झाली आहे. एका दिवसातच Market Cap 4.85 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही 4.85 लाख कोटी रुपयांची घट झाली असे म्हणायला हरकत नाही.