Share Market Today: आज शेअर बाजाराने दाखवले मिश्र संकेत; काय होती एकूण स्थिती?

Share Market Today: शेअर बाजाराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस होता आणि Tata Steel, Mahindra and Mahindra, JSW Steel आणि Tata Motors सारख्या कंपन्यांनी आज भरगोस कमाई केली. चला तर मग पाहुयात की आज बाजारात एकूण स्थिती काय होती.

Nifty-Sensex ने आज किती केली कमाई? (Share Market Today)

आज मुंबईचा शेअर बाजारात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळाली. Nifty 50 हा प्रमुख निर्देशांक 32 अंकांनी वाढून 22,055.70 वर बंद झाला, आणि सोबतच Nifty ने आजच्या दिवसांत 22,123.70 ची उचांकी आणि 21,916.55 नीचांकी पातळी गाठली. दुसऱ्या बाजूला आज Sensex ची कामगिरीही सकारात्मक राहिली. Sensex 72,587.30 वर खुला झाला आणि दिवसाच्या व्यवहारा दरम्यान 72,985.89 चा उचांक आणि 72,314.16 चा नीचांक गाठल्यानंतर शेवटी 36 गुणांनी वधारून 72,679.43 वर बंद झाला. Reliance Industries, Tata Steel, Mahindra and Mahindra अश्या काही कंपन्यांमुळे Sensexचे आकडे वाढले असं म्हणायला हरकत नाही.

मुंबई शेअर बाजारात आज (BSE) Mid Cap आणि Small Cap कंपन्यांच्या निर्देशांकानुसार मिश्र संकेत पाहायला मिळाले (Share Market Today). Mid Cap निर्देशांकात किरकोळ वाढ झाली तर Small Cap निर्देशांकात किरकोळ घट झाली होती.