Share Market Today: बजेट येण्यापूर्वीच शेअर बाजार थंड; Sensexमध्ये झाली 1000 अंकांची घसरण

Share Market Today: काल म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या पहिल्या दिवशी अगदी दमदार कामगिरी बजावल्यानंतर आज शेअर बाजार बंद होताना दमदार आपटला. Sensex सर्वोच्य पातळीवरून थेट 1000 अंकांनी घसरला तर दुसऱ्याबाजूला Nifty मध्ये देखील 300 अंकांची घट झालेली पाहायला मिळाली. बजेट तोंडावर असताना आपला शेअर बाजार उत्तमोत्तम कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जायचा, मात्र आजची परिस्थती पहिली तर सगळीच गणितं चुकतायत की काय असा विचार येतोय.

आज कसा होता शेअर बाजार? (Share Market Today)

पर्वा देशात अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला जाईल आणि आज Sensex आणि Nifty दोघांनी घसरणीचा सूर पकडला आहे. काल म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला हे दोन्ही निर्देशांक उत्तम कामगिरी बजावत होते, मात्र आज दोघांच्या विपरीत कामगिरीमुळे प्रत्येकावर विचार करण्याची वेळ ओढवली आहे. 30 जानेवारी 2024 रोजी, BSE Sensex दिवसाच्या उच्चांकावरून 1,030 अंकांनी घसरून 71,107.77 वर आला, आणि दिवसाच्या अखेरीस 801.67 अंकांनी किंवा 1.11 टक्क्यांनी घसरून 71,139.90 अंकांवर बंद झाला. Nifty 50 निर्देशांक 300 हून अधिक अंकांनी घसरला आणि 21,500 च्या पातळीच्या वरच राहिला.

बजाज फिनसर्व्हचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक घसरले, तर कोरोमंडल इंटरनॅशनलचे शेअर्स 7.67 टक्क्यांनी घसरले. ट्रेंटमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घसरण दिसून आली(Share Market Today). याशिवाय रेन इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये 4.27 टक्के आणि सीमेन्सच्या स्टॉकमध्ये 3.54 टक्क्यांनी घट झाली. आजच्या संपूर्ण बाजारी कामकाजात केवळ टाटा मोटर्स, SBI, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा आणि पवार ग्रीड हेच शेअर्स 2.5 टक्क्यांनी वाढले आहेत.