Share Market Today: आर्थिक वर्षाचा पहिला दिवस बाजारासाठी खास; Sensex-Nifty चे आकडे वाढले

Share Market Today: आजपासून देशात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच शेअर बाजाराबद्दल उत्सुक असणाऱ्यांना आम्ही बाजाराबद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती देणार आहोत. आनंदाची बातमी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशीच बाजारात दमदार खरेदी झालेली पाहायला मिळाली. आज Sensex 363 अंकांनी वाढून 74,014 वर बंद झाला, तर दुसऱ्या बाजूला Nifty 135 अंकांनी वाढून 22,462 वर पोहोचला. आता बाजारातील इतर क्षेत्रांनी कोणती कामगिरी बजावली आहे यावर एक नजर फिरवूयात.

पहिल्या दिवशी बाजार चमकला? (Share Market Today)

असं म्हणतात ज्याची सुरुवात चांगली त्याचा पुढील प्रवास सुद्धा सुलभ होतो. आज देशात आर्थिक वर्षाची नवीन सुरुवात झाली आहे आणि पहिल्या दिवशी बाजाराने दमदार कामगिरी बजावली आहे. आज Sensex आणि Nifty चे शेअर्स वधारलेच पण सोबतच Sensex ने इंट्राडे दरम्यान 74,254 ची पातळी गाठली आणि Nifty ने पहिल्यांदाच 22,529 ची पातळी गाठली, जो नवीन सार्वकालिक उच्चांक म्हणावा लागेल. आजच्या बाजारात मीडिया आणि मेटलच्या क्षेत्रांमध्ये अधिक खरेदी झालेली दिसली मात्र दुसऱ्या बाजूला FMCG आणि वाहन क्षेत्राने गुंतवणूकदारांची निराशा केली.

गुंतवणूकदारांनी कमावले 6.38 लाख कोटी:

Midcap आणि Smallcap बदल बोलायचं झाल्यास दोन्ही बाजूनी आज गुंतवणूकदारांनी कमालीची कमाई केली. Niftyचा Midcap 100 निर्देशांक 836 अंकांच्या किंवा 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 48912 अंकांवर बंद झाला. तर Smallcap निर्देशांक 498 अंकांच्या उसळीसह 15,788 अंकांवर बंद झाला. अगदीच जर का थोडक्यात बाजाराचा अंदाज(Share Market Today) घ्यायचा असेल तर आज Sensex मधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर Nifty च्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि सर्वात शेवटी आज गुंतवणूकदारांनी जवळपास 6.38 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.