Share Market Today: आज शेअर बाजाराने केली दमदार कामगिरी; Paytmच्या शेअर्समध्ये देखील दिसली वाढ

Share Market Today: गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात थोडी मंदी होती, पण आज मोठी तेजी दिसून आली. BSE Sensex तब्बल 365 पॉइंट्स वाढून 72,415 पेक्षा जास्त झाला आहे. त्याचबरोबर, Nifty 50 देखील बराच काळानंतर 22 हजारांच्या पार गेला आहे. आज Nifty 50,124 अंकांनी वाढून 22,034 वर ट्रेड होत होता. विशेष म्हणजे, BSE च्या 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते, फक्त 4 कंपन्यांचे शेअर्स अपवाद ठरले आहेत.

आज कशी होती बाजारातील परिस्थिती? (Share Market Today)

आज शेअर बाजारात चांगली वाढ झाली. मुंबईचा प्रमुख निर्देशांक असलेला Sensex आज सकाळी 72,406.2 वर खुला झाला आणि दिवसभरात त्याने 72,450.31 ची उच्च पातळी गाठली. Nifty नेही शुक्रवारी चांगली सुरुवात केली, तो 22,020.30 वर खुला झाला. Bank Niftyची तर धमालच वेगळी होती, तो 46,395.35 वर पोहोचला. ज्यामध्ये 176.45 गुणांची म्हणजे 0.38 टक्क्यांची वाढ झाली. NSE च्या एकूण 2,334 पैकी 85 शेअर्सनी वरची मर्यादा गाठली आणि 23 शेअर्स खालच्या मर्यादेत गेले. सध्या 127 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत तर 12 शेअर्स 52 आठवड्यांच्या निम्न पातळीवर आहेत.

या शेअर्सनी गाजवले मैदान?

TVS मोटर कंपनीच्या शेअर्समध्ये आज 3.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे प्रति शेअर 2172 रुपयांवर जाऊन पोहोचला. त्याच वेळी, मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये 3.34 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 11,460 रुपयांवर पोहोचले. देवयानीच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. लघु भांडवली कंपनी नॅक्टो फार्माच्या शेअर्समध्ये आज 12 टक्क्यांची वाढ झाली, ते 996 रुपयांवर पोहोचले. ग्रेफाइट इंडियाचे शेअर्स 593 रुपयांवर आहेत, ज्यामध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली(Share Market Today). सगळ्यात शेवटी आज Paytmच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होऊन त्यांची किंमत वाढून 332.35 रुपये प्रति शेअर झालेली पाहायला मिळाली.