Share Market Today: गुंतवणूकदारांचे 1.5 लाख कोटींचे नुकसान; कसा होता एकूण बाजारी दिवस?

Share Market Today: शेअर बाजाराबद्दल सांगायची महत्वाची बाब म्हणजे आज देखील बाजारातील प्रमुख निर्देशांक म्हणजेच Sensex आणि Nifty घसरणीसह बंद झाले आहेत. शेअर बाजाराच्या मागच्या सत्रात चांगली वाढ झाल्यानंतर नफा वसूल करण्यासाठी गुंतवणूकदार पुढे आले, तसेच बऱ्याच प्रमाणात काही शेअर्सची किंमत बरीच जास्त असल्याने गुंतवणूकदारांनी विचार करून पाऊलं उचलली होती.

आज कसा होता Sensex आणि Niftyचा दिवस? (Share Market Today)

Nifty50 ची आजची रंगत थोडी फीकी पडली. आजच्या दिवसाची सुरुवात 22,064.85 रुपयांवर झाली, मात्र दिवसभर Niftyने चढ-उतार अनुभवला. शेवटी Nifty50, 123 अंकांनी म्हणजे 0.56 टक्क्यांनी खाली येऊन 22,023.35 रुपयांवर बंद झाला. केवळ Nifty च नाही तर आजच्या दिवसांत Sensex मध्ये देखील घसरण झाली. आज सकाळी 72,886.77 वर खुला झालेला बाजार शेवटी 454 गुण म्हणजे 0.62 टक्क्यांनी घसरून 72,643.43 रुपयांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे नुकसान झाले का?

आजच्या सत्रात BSE Midcap निर्देशांकही 0.51 टक्क्यांनी घसरला. पण, या सर्वसाधारण ट्रेंडमध्ये BSE SmallCap निर्देशांक मात्र 0.25 टक्क्यांनी वधारला(Share Market Today). एकूणच बाजारातील कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalization)मध्ये आज घसारण झाल्याने जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.