Share Market Today: बाजाराच्या तेजीला पूर्णविराम; Nifty-Sensexच्या अंकांमध्ये घसरण

Share Market Today: मुंबईच्या शेअर बाजारात आज म्हणजेच मंगळवार, 2 एप्रिल रोजी तीन दिवसांची तेजी आटोक्यात आली . Nifty 50 आणि Sensex दोन्हीच्या अंकांमध्ये आज घसरण झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातूनही कमजोर संकेत मिळाले आणि परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors) काढून घेतलेल्या पैशामुळेही अंकांमध्ये कपात झालेली पाहायला मिळाली. 30 कंपन्यांचा समावेश असलेला BSE Sensex 110.64 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 73,903.91 वर बंद झाला. तर Nifty 50 हा व्यापक निर्देशांक 8.70 अंकांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 22,453.30 वर बंद झाला.

बाजारातील आज दिवस कसा होता? (Share Market Today)

शेअर बाजारात आजचा दिवस थोडा गोंधळात्मक होता. काही क्षेत्र चमकली तर काही क्षेत्रांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. Nifty Midcap आणि BSE Smallcap निर्देशांकांनी चांगली वाढ दर्शवली, तर Auto आणि FMCG निर्देशंकांनीही तेजी दर्शवली. मात्र IT, बँकिंग, औषध आणि NBFC या क्षेत्रातील निफ्टी निर्देशांक बऱ्यापैकी घसरले. Hero MotoCorp, कोटक बँक, HCL Technology, ICICI Bank, SBI Life, इन्फोसिस आणि TCS सारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घट झालेली पाहायला मिळाली.

एकंदर निर्देशांक जरी घसरले असले तरी, गुंतवणदारकांसाठी एक चांगली बातमी आहे(Share Market Today). कारण आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या म्हणजेच Market Cap मध्ये मोठी वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे Market Cap आज 395.67 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, म्हणजे गुंतवणदारांच्या संपत्तीत आजच्या सत्रात 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.