Share Market Today : बजेटचा मास्टरस्ट्रोक? आज बाजाराला मिळाली उड्डाणासाठी झेप! 

Share Market Today: येत्या काही दिवसांतच देशात नवीन अर्थसंकल्प म्हणजेच बजेट प्रस्तुत केले जाईल, आणि या बजेटच्या धामधुमीतच आज शेअर बाजार देखील सकाळी तेजीत उघडला, आज Sensex आणि Nifty दोघांनी दमदार कामगिरी बजावत व्यापाराची सुरुवात केली. BSE 30 वाला सेन्सेक्स 600 अंकांवर उघडला तर Nifty ने देखील 150 अंकांच्या पुढे जात बाजाराची सुरुवात केली.

आज सकाळी शेअर बाजार कसा होता? (Share Market Today)

आज सकाळी Bombay Stock Exchange चा 30 शेअर्सचा निर्देशांक Sensex 400 अंकांच्या वाढीसह 70,968.10 च्या पातळीवर उघडला आणि त्यात बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळत होती. बाजार उघडताच काही मिनिटेच त्याने 627.64 अंकांनी किंवा 0.89 टक्क्यांची मोठी झेप घेतली आणि 71,328.31च्या पातळीवर पोहोचला. सोबतच Niftyच्या शेअर्सनी देखील आज खास जोर पकडला होता, तो 124.90 अंकांनी किंवा 0.58 टक्क्यांनी उघडला आणि सकाळी 9.26 पर्यंत तो 21,530.25 वर व्यवहार करीत होता. एकंदरीत हे सगळे आकडे बघता आज सकाळच्या वेळी बाजारात बऱ्यापैकी तेजी आलेली होती आणि बंद होताना देखील दोन्ही निर्देशांक हिरव्या पट्टीत बंद झाले आहेत.

असं म्हणतात की आठवड्याच्या पहिल्याच्या दिवशी आलेल्या या तेजीला बजेट बऱ्यापैकी जबाबदार आहे. जसं की आपण सगळेच जाणतो की येणाऱ्या बजेटकडून अनेक लोकांना विविध अपेक्षा आहेत, आणि हेच बाजारातील तेजीचं प्रमुख कारण असू शकतं. देशात 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं जाईल आणि 31 जानेवारीपासून बजेट स्तराची सुरुवात होणार आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विक्रीमुळे आणि सकारात्मक आशियाई बाजारांमुळे गुंतवणूकदारांना दर्जेदार समभाग खरेदी करण्याची संधी मिळाल्याने देशांतर्गत बाजाराला गती मिळाली आहे. ते म्हणाले की प्रीमियम मूल्यांकन असूनही, अंतरिम बजेट आणि अंदाजानुसार अलीकडील निकालांभोवती आशावादाचे वातावरण आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास कायम आहे.