बिझिनेसनामा ऑनलाईन । दिवसभराच्या चढ-उतारानंतर आज बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार अखेर तेजी पाहायला मिळाली. व्यवहाराच्या अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 178.87 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 61,940.20 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 45.00 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 18,310.95 च्या पातळीवर बंद झाला.
मार्केटच्या वाढीमध्ये ऑटो आणि रियल्टी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. निफ्टीमध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स 2.8% च्या वाढीसह अव्वल ठरले . तर दुसरीकडे UPL चे शेअर्स 2% च्या कमकुवततेसह सर्वात जास्त तोट्यात होते. मागील ट्रेडिंग सत्रात, 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स मध्ये 2.92 अंकांनी घसरण होऊन तो 61,761.33 अंकांवर बंद झाला होता तर निफ्टी 1.55 अंकांच्या किंवा 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 18,265.95 अंकांवर बंद झाला होता.
आज निफ्टी वाढवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी लाइफ, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्प, बीपीसीएल, डिव्हिस लॅब्स या कंपन्यांचा समावेश होता . तर UPL, Dr Reddys Labs, Hindalco, Infosys आणि Larsen या कंपन्यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला .