Share Market Today: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ठरला खास; गुंतवणूकदारांनी कमावले 3.4 लाख कोटी

Share Market Today: आज म्हणजेच 28 मार्च 2024 हा दिवस भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात ‘सोन्याचा अक्षरांनी’ लिहिला जाईल, कारण आज आर्थिक वर्ष 2024 चा शेवटचा दिवस होता आणि याच शेवटच्या दिवशी बाजारात जोरदार तेजीचे वारे वाहिले. Nifty 50 आणि Sensex या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठले. या दिवसात गुंतवणुकदारांच्या पदरात जवळपास 3.4 लाख कोटी इतकी रक्कम पडली आहे, त्यामुळे आजच्या दिवसाला गोड शेवट म्हणावा लागेल.

कसा होता शेवटचा दिवस? (Share Market Today)

आज आर्थिक वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी यामुळे आज बाजारात तेजीचे वातावरण होते. Nifty 50 निर्देशांक सकाळी 22,163.60 च्या पातळीवर उघडला आणि दिवसभर तेजीत राहून शेवटी 203 अंकांनी वाढून 22,326.90 च्या पातळीवर बंद झाला. Sensex नेही सकाळी 73,149.34 च्या पातळीवर उघडत दिवसभरात 74,190.31 चा उच्चांक गाठला, आणि दिवसाच्या शेवटी Sensex 655 गुणांनी वाढून 73,651.35 च्या पातळीवर बंद झाला.

आज Mid Cap आणि Small Cap निर्देशांकांनीही चांगली कामगिरी केली. BSE Mid Cap निर्देशांक 0.62 टक्क्यांनी तर Small Cap निर्देशांक 0.33 टक्क्यांनी वाढला(Share Market Today). Nifty 50 मधील 45 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीची नोंद झाली आहे. या तेजीमुळे BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 387 लाख कोटी इतके झाले आणि फक्त एकाच सत्रात गुंतवणुकदारांच्या पदरात जवळपास 3.4 लाख कोटी एवढी रक्कम वाढली. आजचा शेअर बाजारही बऱ्यापैकी चमकला आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला असून येणाऱ्या काळातही शेअर बाजारात अशीच तेजी कायम राहील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.