Share Market UPI: आता UPI द्वारे करता येणार शेअर बाजारात गुंतवणूक; 1 जानेवारी पासून मिळणार नवीन सुविधा

Share Market UPI: आपल्या देशात UPI चा वापर करून आपण नवीन क्रांती घडवली आहे. सध्या भारतात बहुतांश ठिकाणी इंटरनेटचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जातात आणि यामुळेच आपण जगाच्या नजरेत एक वेगळी छाप सोडली आहे. UPI च्या वापरामुळे देशात आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व्हायला मदत होतेय. आत्ताच्या घडीला इंटरनेट पेमेंटचा वापर वाढला असल्याने अनेक लोकं कॅशलेस झाली आहेत, म्हणजेच ती हातात पैसे घेऊन कोणतेही व्यवहार करत नाहीत. बहुतांश गरजांसाठी केवळ UPI चा वापर केला जातोय. UPI ची वाढती उलाढाल लक्ष्यात घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला UPI पेमेंटच्या बाबतीत एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘UPI फॉर सेकेंडरी मार्केट’ या अनोख्या संकल्पनेचा वापर करून गुंतवणूकदार आता थेट शेअर बाजारात प्रवेश करू शकणार आहेत. काय आहे UPI ची हि अनोखी संकल्पना जाणून घेऊया..

UPI फॉर सेकेंडरी मार्केट नेमकं आहे तरी काय?(Share Market UPI)

भारत देशाची जगभरात UPI चा वापरकर्ता म्हणून ओळख निर्माण होत आहे. देशातील मोठ-मोठाल्या हॉटेल्सपासून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यांवर देखील UPI चा स्कॅनर वापरून पैश्यांची देवाण घेवाण केली जात आहे. इंटरनेटच्या साहाय्याने सुलभ झालेल्या या आर्थिक व्यवहारांना अधिक चालना देण्यासाठी तसेच UPI चा दिवसेंदिवस वाढत जाणारा वापर लक्ष्यात घेत बाजारात UPI फॉर सेकेंडरी मार्केट हि नवीन संकल्पना नववर्षपासून सुरू केली जाईल. UPI फॉर सेकेंडरी मार्केटचा अंतर्गत आता इंटरनेटचा वापर करून केवळ देवाण घेवाणाच नाही तर इतर आर्थिक व्यवहार देखील सहज शक्य होणार आहेत.

UPI सेवेचा वापर करून आता ग्राहक वर्ग शेअर बाजारात, शेअर्सची खरेदी -विक्री करू शकतील(Share Market UPI). राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) आज ही घोषणा केली असून 1 जानेवारी 2024 पासून हि सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. इक्विटी कॅश सेगमेंटसाठी हि नवीन सेवा तयार करण्यात आली आहे. ज्याला क्लिअरिंग कॉर्पोरेशन, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, स्टॉक ब्रोकर, बँक आणि UPI ऍपचे पाठबळ मिळेल. UPI च्या या नवीन सेवेमुळे शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले जाईल. भारतीय सर्वोच्य बँककडून या नवीन उपक्रमाला सहमती मिळाली असून हि सेवा सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट ही थीमवर आधारीत असेल.

मर्यादित ग्राहकांसाठी खुली असेल सुविधा:

शेअर बाजारात पहिल्यांदाच उतरलेल्या UPI ची सेवा हि थोडक्यात पुरवली जाईल. मर्यादित लोकांसाठी सुरु होणार हा उपक्रम एक पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाईल. सध्या HDFC Bank, HSBC, ICICI Bank, Yes Bank , क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि एक्सचेंज हे नवीन उपक्रमामध्ये स्पॉन्सरचे काम करतील. इथे गुंतवणूकदार बँकेतील रकमेच्या आधारे गुंतवणूक सुरु करू शकतात तसेच हि रक्कम मागे घेता येऊ शकते. संपूर्ण कार्यकाळात ट्रेड पूर्ण झाल्यावर ग्राहकांच्या खात्यातून रक्कम काढील जाईल आणि त्यानंतर क्लिअरिंग कॉर्पोरेशन ग्राहकांना थेट T+1 या आधारावर लाभ मिळवून देणार आहे. हा उपक्रम सध्यासाठी सुरवातीच्या टप्प्यात असल्याने केवळ HDFC बँक आणि ICICI बँकचे ग्राहक या सुविधांचा लाभ मिळवू शकतात(Share Market UPI). Groww या ब्रोकरेज कंपनीचा देखील या उपक्रमात महत्वाचा वाटा असेल, तसेच येणाऱ्या काळात zerodha आणि इतर बँका यात सहभागी होणार आहेत.