Share Market: उद्याच्या शनिवारी म्हणजेच 2 मार्च रोजी BSE आणि NSE दोन्ही Exchanges 2 तासांसाठी खास ट्रेडिंग सेशनसाठी खुले राहणार आहेत. यामागे कारण आहे ते म्हणजे Disaster Recovery साइटची चाचणी. Exchange कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असणं गरजेचं असतं. त्यामुळे, ते Primary Site वरून Disaster Site वर स्विचओव्हर करून कामाची कार्यक्षमता तपासली जाईल. शनिवारी equity आणि equity derivative विभागात हे खास ट्रेडिंग सेशन आयोजित केले जाणार आहे.
दोन सत्रात होणार शेअर बाजारातील व्यवहार: (Share Market)
शनिवार 2 मार्च रोजी शेअर बाजार दोन वेळा खुला राहणार आहे. हे विशेष सत्र आपत्कालीन परिस्थितीत बाजार कसा काम करेल याची चाचणी घेण्यासाठी आयोजित केले जात आहे. पहिलं सत्र सकाळी 9:15 ते 10:00 पर्यंत प्रामुख साइटवर होईल. यानंतर, बाजार आपत्कालीन पुनर्प्राप्ती साइटवर स्विच करेल. दुसरं सत्र सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत घेतलं जाईल. या दोन्ही सत्रांमध्ये, सर्व सिक्युरिटीजची (डेरिवेटिव्हससह) किंमत ५ टक्क्यांपर्यंत बदलू शकतात. मात्र, २ टक्क्यांपर्यंतच्या किंमत दायऱ्यात असलेल्या सिक्युरिटीज तश्याच राहतील. पहिल्या सत्रासाठी प्री-ओपन सत्र सकाळी 9 वाजता ते 9.08 पर्यंत होईल. दुसऱ्या सत्रासाठी प्री-ओपन सत्र 11.15 वाजता ते 11.23 पर्यंत होईल आणि डिजास्टर साइटवर क्लोजिंग सत्र 12.40 वाजता ते 12.50 पर्यंत घेतले जाईल.