Share Market: शनिवारी 2 मार्च रोजी शेअर बाजारात NSE चे खास सत्र; कारण काय?

Share Market: National Stock Exchange (NSE) 2 मार्च रोजी शनिवारी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करणार आहे. या सत्रात equity आणि equity derivative दोन्ही विभागांमध्ये व्यापार होईल. हे विशेष सत्र आयोजित करण्यामागील उद्देश म्हणजे आपत्तीच्या वेळी NSE च्या कार्यक्षमतेची चाचणी घेणे होय. या दिवशी, NSE Disaster Recovery Site वर Intra-Day switch over करेल. ही साइट सायबर हल्ल्यासारख्या घटनांमध्ये डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते. या विशेष सत्रामुळे शेअर बाजारातील व्यापार अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. तसेच, NSE आपत्कालीन परिस्थितीतही कार्यक्षमतेने काम करू शकते की नाही याची खात्री पटेल.

Disaster Recovery Site काय आहे? (Share Market)

Disaster Recovery Site ही एक दुय्यम साइट आहे जी सायबर हल्ल्यासारख्या आपत्तीच्या वेळी डेटा आणि ट्रेडिंग कार्ये सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. ट्रेडिंग सायबर हल्ले, सर्व्हर क्रॅश आणि इतर अनेक समस्यांमुळे त्रस्त होत असतात. अशा घटनांमुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत DR Site (Disaster Recovery Site) अत्यंत महत्वाची भूमिका बजावते.

NSE डिझास्टर रिकव्हरी सत्र: काय, कधी आणि का?

NSE Disaster Recovery सत्र दोन टप्प्यात आयोजित करणार आहे. हे सत्र 2 मार्च 2024 रोजी NSE वर पाहायला मिळेल(Share Market). या सत्राची विभागणी दोन टप्प्यांमध्ये केली गेली असून, पहिला टप्पा सकाळी 9.15 ते 10.10 पर्यंत प्राथमिक साइटवर आयोजित केले जाईल आणि या टप्प्यात सर्व प्रकारच्या सिक्युरिटीजसाठी नियमित ट्रेडिंग होईल. त्यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत डिझास्टर रिकव्हरी साइटवर आयोजित केले जाईल, जिथे सर्व प्रकारच्या सिक्युरिटीजसाठी अप्पर आणि लोअर सर्किट 5 टक्के असेल.