Shark Tank India: शार्क टॅंकमध्ये झाली कमल; बाजारात मिळतेय 300ml Iced-Tea फक्त 99 रुपये!

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया हा कार्यक्रम भारतात बराच गाजतोय, पहिल्या भागानंतर दुसरा आणि आता तिसरा असे एका मागून एक भाग प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. देशभरातून विविध व्यावसायिक त्यांचे व्यवसाय घेऊन या कार्यक्रमाच्या मदतीने गुंतवणूकदार शोधण्याचा प्रयत्न करतात, काही नक्कीच यशस्वी होतात तर इतरांना नशीबाची मदत मिळत नाही. नुकतेच, एका स्टार्टअपचे संस्थापक शार्क टँक इंडियाच्या मंचावर आले आणि सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या उत्पादनाचे सर्वांनी कौतुक केले आणि त्यावर अभिप्रायही दिला.

कोणता आहे हा हटके स्टार्टअप? (Shark Tank India)

बंगलोरमधील दोन तरुण, गौरांग गाडिया आणि अविक चौधरी यांनी FOMO नावाचा ‘Iced-Tea’ चा एक स्टार्टअप सुरू केला आहे. गौरांग National Law University मधून Business Law मध्ये मास्टर्स, तर अविक Executive MBA करत आहेत. दोघांनाही Mocktail आवडतात पण त्यात नेहमीच साखर असल्यामुळे ते टाळायचे. त्यांना असे वाटायचे की लोकांना Calories असलेले पेय पदार्थ देणे चुकीचे आहे. इथूनच त्यांना सुचली एक भन्नाट कल्पना आणि मग त्यांनी असे काहीतरी बनवायचे ठरवले जे दैनंदिन जीवनात वापरता येईल आणि प्यायल्यावर कोणालाही पश्चाताप होणार नाही.

पुढे त्यांच्या नवीन स्टार्टअपने 300ml Iced-Tea बाजारात आणली, जी फक्त 99 रुपये किमतीत उपलब्ध आहे. यात कोका-कोलपेक्षा अर्धी साखर असल्याचा दावा ते करतात आणि ते विविध प्रकारच्या प्रीमिक्स मध्येही उपलब्ध असल्याचेही सांगतात(Shark Tank India). या प्रीमिक्सची किंमत 35 रुपये आहे आणि त्यापासून 300ml Iced-Tea बनवता येते.

शार्क टँक इंडिया मध्ये, या स्टार्टअपला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की प्रत्येक शार्क त्यात गुंतवणूक करू इच्छित होता. प्रत्येक शार्कने कंपनीच्या संस्थापकांना offer देखील दिली आणि equity कमी करण्यासही तयार झाले. अखेरीस, स्टार्टअपने अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांच्यासोबत करार केला आणि त्यांनी 35 लाख रुपयांमध्ये 5.83 कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर 6 टक्क्यांची इक्विटी दिली.