Shark Tank India: नमिता थापरवर “Startup वाली” नाराज; Instagram वरून सोडलंय टीकास्त्र

Shark Tank India: जीविका त्यागी यांनी नुकतेच एका Instagram Post मध्ये शार्क नमिता थापर यांच्यावर ‘आस्तेय’ ला ‘लहान’ आणि ‘अप्रभावी’ म्हटल्याबद्दल टीका केली आहे, त्यांच्या या टीकास्त्रात त्यांनी सोनी टीव्ही चॅनेलवरही निशाणा साधला. जीविका त्यागी आणि कनपुरिया मुंद्रा यांनी या स्टार्टअपची स्थापना केली असून ‘आस्तेय’ हे भारतातील पहिले एथलीजर ब्रॅंड असल्याचा दावा या दोन्ही सह-संस्थापक करतात. शार्क टॅंक इंडिया 3 मध्ये त्यांनी 40 कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर 2 टक्के इक्विटीसाठी 80 लाख रुपये गुंतवणुकीची मागणी केली होती.

शार्क टॅंकच्या ‘या’ भागात झालं तरी काय? (Shark Tank India)

2022 मध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअपने आतापर्यंत 10 कोटी रुपयांची फंडिंग उभारली आहे. शार्क टँकचा भाग चित्रित होईपर्यंत कंपनीची एकूण विक्री 2 कोटी रुपये होती. स्टार्टअपने सांगितले की त्यांनी आतापर्यंत 20 हजारांहून अधिक कपडे विकले आहेत. जीविका म्हणाली की त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांचा स्टॉक, जवळपास 1 कोटी रुपयांची देणी आहे आणि सध्या त्यांच्या खात्यात एक रुपयाही नाही.

यावर नमिता थापर काय म्हणाल्या?

नमिता थापर यांच्या मते, दोन्ही संस्थापकांनी मार्केटिंगमध्ये पूर्ण 10 कोटी रुपये खर्च केले असले तरीही त्यांनी ब्रँड तयार केला असे म्हणता येणार नाही. दोघींनी जर का ब्रँड तयार केला असता, मूळ विक्री जी 50 लाख रुपये प्रति महिना होती, त्यातील 20-30 टक्के ग्राहक पुन्हा त्यांच्याकडे वळलेच असते आणि काही ना काही विक्री तरी नक्कीच झाली असती(Shark Tank India). व्यवसायिकांनी सांगितल्याप्रमाणे ही विक्री 1.5 लाख रुपयांपर्यंत कमी झाली नसती.

सर्व घटनेवर जीविकाची प्रतिक्रिया काय?

जीविका त्यागी नावाच्या उद्योजकाचा ‘शार्क टँक इंडिया’ या शोमध्ये नमिता थापर यांच्याशी वाद झाला. जीविका यांनी ‘आस्तेय’ नावाचा एक स्टार्टअप सुरू केला आहे आणि त्यासाठी त्यांनी शार्क टँक इंडियामध्ये निधी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, नमिता थापर यांनी जीविका यांच्या बिझनेस मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांनी 10 कोटी रुपये मार्केटिंगवर खर्च केल्याबद्दल त्यांना टोकले.

नमिता थापर यांच्या म्हणण्यानुसार, जीविका यांनी 10 कोटी रुपये मार्केटिंगवर खर्च केले असल्याने त्यांच्याकडे पुरेसा मालमत्ता (inventory) नसणं हे आर्थिक गैरव्यवस्थापनाचं लक्षण आहे. यावर जीविका यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि शार्क टँक इंडिया खरंच उद्योजकतेला प्रोत्साहन देत असल्यास नमिता थापर यांनी अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करू नयेत असं म्हटलं आहे. शार्क टँक इंडियामधील इतर कोणत्याही शार्कने जीविका यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, त्यामुळे जीविका यांना शोमधून रिकाम्या हाताने परत जावं लागलं.